PCOS आजार असल्यास फॉलो करा हा डायट प्लान

पीसीओएस आजार असल्यास कोण कोणत्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. या विषयी जाणून घेणार आहोत. पीसीओएस म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम महिलांच्या शरीरात एड्रोजन हार्मोनची पातळी वाढल्यामुळे अंडाशयात अनेक सिस्ट तयार होऊ लागतात.

हे गुठळ्या लहान पिशवीच्या आकाराच्या असतात हळहळू या गुठळ्या मोठ्या होऊ लागतात आणि मग ते ओव्हुलेशन प्रक्रियेत अडथळा आणतात. पीसीओएस आजार असल्यामुळे महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे गर्भधारणा होणे कठीण होते.

योग्य आणि पोषक आहार न घेतल्याने, शारीरिक व्यायाम न केल्याने मासिक पाळी अनियमित होऊन पीसीओएस आजार होऊ शकतो. पीसीओएस आजार असल्यास आपल्या जेवणाच्या वेळा पाळल्या पाहिजे. सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण मोड आलेले कडधान्ये, फळांचा ज्यूस, इडली, उपमा असे पचायला हलके पदार्थ एक प्लेट ह्या प्रमाणात खाऊ शकता.

दुपारच्या जेवणात नाचणीची भाकरी, चपाती अथवा ज्वारीची भाकरी जे पण आपण खात असाल भाकरी असेल तर अर्धी भाकरी आणि चपाती असेल तर दीड चपाती त्यासोबत डाळ, पातळ भाजी, आणि एक मोठी वाटी पालेभाज्यांचे सलाड मुख्यत पालकचे सलाड असणे गरजेच आहे.

हे जेवण घेतल्यानंतर रात्रीच्या जेवणाआधी भूक लागल्यास काकडी, गाजर, बीट हे खाऊ शकता. रात्रीचे जेवण 8 वाजता करा. जेवणामध्ये भाकरी आणि भाजी सोबत सलाड आपण खाऊ शकता.

हा डायट प्लान फॉलो करायला सुरुवात केल्यानंतर चांगल्या परिणामासाठी पुढील गोष्टी करणे गरजेच आहे. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये यांचा आपण आहारात समावेश करू शकता.

आपल्या जेवणात मिठाचा आणि साखरेचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करायचा आहे. दररोज दिवसभरात 4 लिटर पाणी प्यायचे आहे. चहा/ कॉफी पिणे थांबवायचे आहे.

तेलकट पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाऊ नका. दररोज सकाळी 30 मिनिटे शारीरिक व्यायाम करायचा आहे. शारीरिक व्यायाम करणे शक्य नसल्यास सकाळी चालायला जा. रात्रीचे जेवण केल्यानंतर शतपावली करा. दररोज 7 ते 8 तास झोप घ्या. शरीराला आराम मिळण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

आपल्याला PCOS आजार असल्यास फॉलो करा हा डायट प्लान हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page