महिलांमध्ये होणाऱ्या पीसीओडी आजाराबद्द्ल आपण आज जाणून घेणार आहोत. पीसीओडी म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसीज म्हणून ओळखला जातो. महिलांच्या शरीरात हार्मोनमध्ये असंतुलन झाल्यामुळे शरीरात पुरुष हार्मोन म्हणजेच एंड्रोजनची पातळी वाढून अंडाशयांवर सिस्ट अर्थात गाठी तयार होऊ लागतात. यालाच पीसीओडी म्हणतात. आता आपण पीसीओडी आजार होण्याची कारणे जाणून घेणार आहोत.
बैठे काम करण्याची सवय, वेळेवर जेवण न करण्याची सवय, आहारात पुरेश्या पोष्टिक गोष्टींचा अभाव, वाढलेले वजन, अनियमित मासिक पाळी, पुरेशी झोप न घेणे, शारीरिक व्यायामाचा अभाव आणि अनुवांशिकतेमुळे पीसीओडी हा आजार होण्याची शक्यता असते.
आता आपण पीसीओडी आजाराची लक्षणे जाणून घेऊयात मासिक पाळी दरम्यान खूप वेदना होणे, जास्त रक्तस्त्राव होणे, वेळेवर मासिक पाळी न येणे, शरीरावर अतिरिक्त केस येणे, ओटीपोटात सतत वेदना होत राहणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर हातांवर पुरळ येणे, त्वचा तेलकट होणे, रक्तदाब वाढणे, हार्मोन असंतुलन होणे.
रात्रीची झोप न येणे, सतत थकवा आल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, सारखे सारखे मूड बदलणे पीसीओडी आजारा दरम्यान अशी लक्षणे दिसू शकतात. आपल्याला अशी लक्षणे जाणवत असल्यास आपण शक्य तितक्या लवकर स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे.
आपल्याला पीसीओडी आजार होण्याची कारणे आणि लक्षणे फायदे हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.