पायांवरील टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय

कडक उन्हामुळे पायांना खूप घाम येतो त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण पायात चपला किंवा सँडल वापरणे पसंत करतात. बाहेर उन्हात जायचं म्हटल कि चेहऱ्याला, मानेला, हातांना सन स्क्रीन लावून बाहेर जातो. चेहऱ्याला स्कार्फ बांधून बाहेर पडतो.

मात्र बाहेर जाऊन आल्यानंतर चपला, सँडल पायातून काढल्यावर आपण बघतो. उन्हामुळे आणि धुळीने ज्याठिकाणी चपलांचे बंध होते तो भाग सोडून आपला पूर्ण पाय टॅन झालाय. पायांवर चपलांमुळे झालेलं टॅनिंग कस घालवायच हे आपल्याला माहित नसत. घालवण्यासाठी म्हणूनच आज आपण पायांवरील टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

पायांवर उन्हामुळे आलेला काळेपणा घालवण्यासाठी हा सोपा उपाय आपण करून बघू शकता. यासाठी एका वाटीत थोडेसे दही आणि बेसन पीठ घ्या. त्यानंतर ते हाताने एकजीव करून आपल्या पायांवर लावा आणि हाताने चोळा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने पाय धुऊन टाका. 1 ते 2 वेळा हा उपाय केल्याने आपल्या पायांवरील काळेपणा आणि टॅनिंग दूर होईल.

पायांवर आलेला काळेपणा जाण्यासाठी रात्री झोपताना पायांवर कोरफड जेल आणि बदाम तेल एकत्र करून लावा. सकाळी झोपेतून उठल्यावर पाय पाण्याने धुऊन टाका.

पायांवरील टॅनिंग घालवण्यासाठी आपण संत्र्याच्या सालीच्या पावडरचा देखील वापर करू शकता यासाठी 2 चमचे संत्र्याच्या सालीची पावडर थोड्याश्या दह्यात मिसळून पायांवर लावा. 30 मिनिटे राहूद्या नंतर पाय पाण्याने धुऊन टाका. दिवसातून 1 ते 2 वेळा हा उपाय केल्याने आपल्या पायांवरील टॅनिंग दूर होईल.

आपल्याला पायांवरील टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page