पायांना सूज येणे घरगुती उपाय

एका जागेवर बराच वेळ उभे राहून काम केल्याने, आपल्या पायांच्या क्षमतेपेक्षा जास्त चालल्याने, पायात रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे, आपले वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढले असल्यास, किडनीचे आजार असल्यास त्यामुळे आपल्या पायांना बऱ्याचदा सूज येते. पायांना गोळे आल्यासारखे वाटते.

आपल्या पायांना सूज आल्यामुळे आपल्याला दैनंदिन काम करणे देखील अवघड होऊन जाते. म्हणूनच आज आपण पायांना सूज आल्यावर सूज घालवण्यासाठी कोणकोणते प्राथमिक घरगुती उपाय करू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत.

आपल्या पायांना सूज आल्यावर आपण हा सोपा उपाय करू शकता यासाठी एका टबमध्ये आपले पाय बुडतील इतके गरम पाणी घ्या त्यामध्ये 2-3 मोठे चमचे खडे मीठ अथवा सैंधव मीठ मिसळा त्यानंतर आपले पाय गरम पाण्यात ठेवून 15 मिनिटे आपले पाय शेकवा.

गरम पाण्याने पाय शेकवल्यावर आपल्या पायांमध्ये रक्ताभिसरण क्रिया चांगल्या प्रकारे व्हायला लागेल आणि पायांवरील सूज कमी होईल. आपल्या पायांवरील सूज कमी करण्यासाठी आपण 2 चमचे ऑलिव ऑइल गरम करून त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या ठेचून टाका. त्यानंतर हलक्या हातांनी ऑलिव ऑइल पायांवर लावून 10 मिनटे चोळा असे केल्याने पायांवर आलेली सूज कमी होईल.

पायांवरील सूज कमी घालवण्यासाठी एका वाटीत मोहरीचे तेल घ्या त्यानंतर हे मोहरीचे तेल किंचित गरम करून रात्री झोपण्यापूर्वी, आपल्या सुजलेल्या पायांवर लावा हलक्या हाताने दहा मिनिटे मालिश करा. पायांची मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने होत असलेल्या वेदना कमी होऊन पायांवरील सूज कमी होईल.

आपल्याला पायांना सूज येणे घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page