पावसाळ्यात पायांना चिखल्या होणे घरगुती उपाय

आपले पाय पावसाळ्यात पाण्याच्या सतत संपर्कात येत असतात. पावसाळ्यात दुषित पाण्याच्या सतत संपर्कात आल्याने, चिखलाच्या संपर्कात आल्यामुळे पायाला बोटांच्या मध्ये सुरवातीला खाज सुटते नंतर त्याचे रूपांतर जखमेत होऊन पायाच्या बोटाच्या मध्ये चिखल्या येणे, भेगा पडणे अशा समस्या होत असतात.

बऱ्याचदा चिखल्या झाल्यावर त्यामधून रक्त हि येते. अशावेळी चिखल्यापासून आराम मिळण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

चिखल्यापासून आराम मिळण्यासाठी आपण हा सोपा उपाय करू शकता रात्री झोपायच्या आधी टबमध्ये आपले तळपाय बुडतील इतके गरम पाणी घ्या त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा मिसळा बेकिंग सोड्यामध्ये एन्टी फंगल गुणधर्म असतात. त्यानंतर आपले पाय त्या पाण्यात सोडून साधारणपणे 15 मिनिटे बसा.

नंतर पाय टॉवेलच्या मदतीने पाय चांगले कोरडे करा आणि ज्याठिकाणी जखम झालेली आहे त्याभागावर कडूलिंबाच्या पानाची पेस्ट नारळाच्या तेलामध्ये मिसळून लावा. हा उपाय 1 आठवडा केल्याने आपल्या पायांवरील चिखल्या नाहीश्या होतील.

चिखल्यावर कडुलिंबाचे तेल लावल्याने जखमा लवकर बऱ्या होतात. आपल्या पायांना चिखल्या होऊ नये यासाठी पावसाळ्यात आपल्या पायाच्या बोटांमध्ये कडूलिंबाचे तेल लावूनच बाहेर पडा.

पावसाळ्यात बाहेरून आल्यानंतर पाय कोमट पाण्याने धुऊन चांगले कोरडे करून पायाच्या बोटांना एरंडेल तेल लावा. एरंडेल तेल लावल्याने चिखल्या येत नाही.

पायाला चिखल्या होऊ नये यासाठी पावसाळ्यात पायात गमबूट वापरा. पावसात भिजल्यावर बाहेरून आल्यानंतर पाय चांगले कोरडे करा. आणि बोटांना नारळाचे किंवा कडूलिंबाचे तेल लावा.

आपल्याला पावसाळ्यात पायांना चिखल्या होणे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page