हाता पायाला मुंग्या कशामुळे येतात? हाता पायाला मुंग्या येणे घरगुती उपाय

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव यासाठी आम्ही नियमितपणे आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो. हि माहिती नियमीत वाचायला मिळण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक/ फॉलो करू शकता. आता आपण एका महत्वाच्या विषयावरील माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे लक्षपूर्वक पूर्ण माहिती वाचा.

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आम्हाला मेसेज करून विचारल होत कि हाता पायांना मुंग्या कशामुळे येतात. म्हणूनच आज आपण त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

एकाच जागी बराच वेळ बसल्यावर हाताला किंवा पायाला मुंग्या येणे ह्या सामान्य वाटणाऱ्या गोष्टीचे कारण म्हणजे आपल्या शरीरात विटामीन बी12 ची कमतरता असू शकते. आपल्या शरीरात विटामीन बी12 ची कमतरता असल्यास डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखे वाटत, हाता पायांना मुंग्या येतात, खाण्यावरची इच्छा उडून जाते, चिडचिडेपणा वाढतो.

आता आपण हाता पायाला मुंग्या येणे थांबवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो हे जाणून घेऊयात. विटामिन बी12 ची कमतरता दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारात दुध, दही, ताक, पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करू शकता.

याशिवाय सोयाबीन आणि बदामामध्ये देखील विटामिन बी12 असते त्यांचा हि आपण आहारात समावेश करू शकता. जर आपण मांसाहार करत असाल तर अंडी, चिकन, मासे यांचा समावेश आहारात करू शकता.

विटामिन बी12 हे विद्राव्य असते त्यामुळे त्याची कमतरता दूर करण्यासाठी वरती दिलेल्या गोष्टी थोड्या प्रमाणात तरी आपल्याला आहारात समावेश आपण करू शकता. आपल्याला हाता पायाला मुंग्या येणे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page