बऱ्याचदा खेळताना, जिना उतरत असताना आपला पाय मुडपतो. त्यानंतर त्याठिकाणी प्रचंड वेदना सुरु होतात. आणि सूज हि येते. अशावेळी ही सूज लवकर कमी होत नाही आणि या वेदना असह्य होतात. पाय मुरगळल्यानंतर सूज आल्यानंतर सूज कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात सूज आल्यास कोणते घरगुती उपाय करता येतील.
व्यायाम करताना अथवा चालताना पडल्यास सूज आली तर तुम्ही सूज आलेल्या जागेवर त्वरित बर्फ लावला तर ही सूज लवकर कमी होईल. सूज आल्यानंतर बर्फ लावणे हा एक सोपा उपाय आहे. बर्फ हा वेदना कमी करण्यासाठी मदत करतो. तसेच याने सूज ही लवकर कमी होते.
सूज जास्त असेल तर त्यावर हळद लावू शकता. ही हळद थोडीशी ओलसर करून सूज आलेल्या भागावर लावल्यास आराम मिळतो. हळद ही सहज उपलब्ध होते. त्यामुळे सूज आल्यानंतर आपल्याला सहज हा उपाय करता येईल.
सूज कमी करण्यासाठी लवंगाचे तेल घेऊन सूज आलेल्या ठिकाणी अगदी हलक्या हाताने मालिश करा. लवंग तेलामध्ये ऍनास्थेटीक हा घटक असतो ज्यामुळे सूज लवकर कमी होण्यास मदत मिळते. आणि आराम मिळतो.
एरंडेल तेलात ट्राय ग्लिसरॉइड आणि रिसिनोलीक ऍसिड हे घटक असतात. जे सूज कमी करण्यासाठी फार उपयुक्त असतात. एरंडाचे तेल कापडाला लावून ही पट्टी सूज आलेल्या ठिकाणी बांधा आणि 15 ते 20 मिनिटानंतर काढा. एरंडेल तेलाचा शेक सुजेला बसून सुज लवकर कमी होते.
सूज कमी करण्यासाठी सूज आलेल्या ठिकाणी जाडे मीठ थोडे ओलसर करून लावल्यास सूज कमी होते. मीठ हे वेदनानाशक म्हणून काम करते. त्यामुळे सूज लवकर कमी होईल आणि तुम्हाला नक्की आराम मिळेल. तसेच कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून सुज आलेला भाग शेकवल्यास हि आराम मिळेल.
आपल्याला पाय मुरगळून सूज येणे घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.