पावसाळ्यात सर्दी, थंडी-ताप, खोकला, घसादुखी, डेंगू, चिकनगुनिया होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी

पावसाला सुरुवात झाली कि वातावरणातील बदलांमुळे हवेत आद्रता असल्याने जंतूच्या वाढीस पोषक वातावरण असल्याने साथीचे आजार व्हायला सुरुवात होते. पावसात भिजल्याने सर्दी, थंडी-ताप, दुषित पाणी प्यायल्याने घसादुखी, साचलेल्या पाण्यात मच्छर होतात त्यामुळे डेंगू, चिकनगुनिया असे आजार होण्याचा धोका असतो.

म्हणूनच पावसाळ्यात आपल्याला हे आजार होऊ नये यासाठी काही सोप्या टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत ज्यांच्या मदतीने आपण पावसाळ्यात निरोगी राहू शकता. पावसाळ्यात बऱ्याचदा दुषित पाणी येत असत त्यामुळे प्यायचे पाणी उकळून गाळूनच प्या.

पाणी उकळल्याने त्यामध्ये असणारे बॅक्टेरीया मरून जातात. आपल्या घरात लहान मुले, वृद्ध व्यक्ती असतील तर आपण पाण्याच्या बाबतीत हि काळजी घेतली पाहिजे. दिवसभरातून एकदा तरी कोमट पाणी प्यायल्यास घसादुखी हा आजार आपल्याला होणार नाही.

पावसाळ्यात सर्दी,थंडी-ताप हा आजार होऊ नये यासाठी पावसात भिजणे टाळा छत्री, रेनकोट यांचा वापर करा. जर चुकून आपण भिजलेच तर घरी आल्यावर पहिले डोके चांगले कोरडे करा अंग पुसा मग गरम गरम भाज्यांचे सूप किंवा कोमट दुधात थोडीशी हळद पावडर मिसळून ते प्या.

पावसाळ्यात उघड्यावरचे अन्न पदार्थ खाणे टाळा, उघड्यावरच्या अन्नपदार्थांवर बसणाऱ्या माश्यांमुळे, जंतूच्यामुळे पोटदुखी, जुलाब असे आजार होण्याचा धोका असतो त्यामुळे पावसाळ्यात उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नका.

लहान मुलांना आणि घरातील वृद्ध माणसाना साथीचे आजार होऊ नये यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा गुळवेल काढा, आल्याचा काढा, तुळशीच्या पानांचा काढा द्या.

डेंगू, चिकनगुनिया हे आजार मच्छरांमुळे होतात. आपल्या घराच्या आजूबाजूला पाण्याची डबकी असल्यास ती बुजवा, घराच्या आजूबाजूला पाणी साठून देऊ नका. संध्याकाळच्या वेळी मच्छर अगरबत्ती लावा. घराच्या खिडक्या बंद ठेवा. मच्छरदाणीचा वापर करा. घरातील ओला कचरा कचराकुंडीतच टाका घराच्या आजूबाजूला कचरा टाकू नका.

आपले आरोग्य चांगले राहो! आपल्याला पावसाळ्यात साथीचे आजार होऊ नये यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page