पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याचे 6 आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

पावसाळ्यात गरमागरम तिखट मीठ लावलेले मक्याचे कणीस खायला आपल्या सगळ्यांनाच आवडत. नुसत्या मक्याच्या कणीसाचा विचार केल्याने देखील तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.

मात्र मक्याचे कणीस खाल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे आपल्याला माहित आहे का? काळजी करू नका आज आपण मक्याचे कणीस खाल्याने मिळणारे फायदेच जाणून घेणार आहोत.

मक्याच्या दाण्यांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन ए, फॉलिक एसिड, लोह, कॅल्शियम, थायामिन, झिंक, मॅग्नेशियम खनिजे आणि एन्टी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

मक्याचे कणीस खाल्याने त्यामध्ये असणाऱ्या फायबर घटकांमुळे पचनशक्ती सुधारते. मक्याच्या कणसाचा आहारात समावेश केल्याने अपचन, बद्धकोष्ठता, गॅस, एसिडिटी या समस्यांपासून सुटका मिळते.

मक्याच्या कणसाचा आहारात समावेश केल्याने त्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन बी 12, फॉलिक असिड आणि लोह ह्या घटकांमुळे  आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. एनिमिया आजारापासून आपले संरक्षण होते.

मक्याच्या कणसामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. मक्याचे कणसाचे सेवन केल्याने हाडे, स्नायू आणि दात मजबूत होतात. मक्याचे कणीस खाल्याने त्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन बी 6, लोह, व्हिटॅमिन ए, थायामिन, झिंक आणि मॅग्नेशियम या घटकांमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत मिळते.

मक्याच्या कणसामध्ये एन्टीऑक्सिडंट घटक असतात जे आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. मक्याच्या कणसाचे सेवन केल्याने नजर तीक्ष्ण होते. मकाच्या पिवळ्या दाण्यांमध्ये कॅरोटीनॉइड असते, जे दृष्टी वाढवण्यास मदत करते

मक्याचे कणीस खाल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होऊन शरीराला ऊर्जा मिळते. मक्याच्या कणसामध्ये कोलेस्टेरॉल हे खूप कमी प्रमाणात असते त्यामुळे मक्याचे कणीस हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप चांगले असते.

आपल्याला पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याचे 6 आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे हि माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला सांगा. आपल्याला माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की आम्हाला प्रोत्साहीत करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page