पावसाळ्यात “डोक्यात होणारा कोंडा” घरगुती उपाय

पावसाळ्यात दाट केस असणाऱ्यांनी केसांची काळजी घेणे गरजेच असत. कारण पावसाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण अधिक असते. केस नियमित न धुतल्याने, डोक्यावरील मृत त्वचा, धूळ, प्रदूषण, घाण टाळूमध्ये साचू लागते.

त्यामुळे कोंडा आणि फंगल इन्फेक्शनचा धोका असतो. त्यामुळे केस नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेच आहे. केसांमध्ये कोंडा झाल्यावर नेमके कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

कोरफडामध्ये असणाऱ्या एन्टीबॅक्टेरियल आणि एन्टीफंगल गुणधर्मांमुळे आपल्या केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत मिळते. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी कोरफडीचे जेल आपल्या टाळूवर अर्थात केसांच्या मुळाशी लावा. अर्धा तास राहूद्या नंतर रिठाच्या मदतीने केस धुऊन टाका. हा उपाय केल्याने आपल्या केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण कमी होते.

केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी कडुनिंबाच्या पानांची पेस्ट बनवून टाळूवर लावल्याने देखील आपल्या केसांमधील कोंडा कमी होऊ शकतो. कडूलिंबामध्ये असणारे एन्टीबॅक्टेरियल आणि एन्टीफंगल गुणधर्म कोंडा कमी करण्यास मदत करतात.

आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा तिळाच्या तेलाने टाळूची मसाज केल्याने केसगळती कमी होते तसेच केसांमध्ये कोंडा होत नाही. साखरेच्या अतिसेवनामुळे टाळू अधिक तेलकट होते. आणि  केसांमध्ये कोंडा वाढतो.

त्यामुळे केसांमध्ये कोंडा होऊ नये यासाठी आपल्या आहारातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवा. आपल्याला पावसाळ्यात “डोक्यात होणारा कोंडा” घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page