पवना मावळ चा संरक्षक विसापूर

विसापूर म्हणजे पवना मावळच्या संरक्षक दुर्गांपैकी एक. मावळ तालुक्यात लोणावळ्याच्या पूर्वेला मळवली रेल्वे स्टेशन जवळ असलेला डोंगरी किल्ला. महाराष्ट्रतील प्रत्येक किल्ल्याचं काहींना काही तरी गुणवैशिष्ट्ये तर असतंच असत.

विसापूर ही यापैकी एक विसापूर किल्ला चहूबाजूंनी कातळकडय़ांचे नैसर्गिक संरक्षण असलेला निसर्गाच्या कुशीत लपलेले दुर्ग रत्न. लोहगडापेक्षा उंचीला आणि आकाराला सुद्धा तसा मोठा किल्ला पण तितका प्रसिद्ध नसलेला किल्ला.

किल्ल्यावर प्रशस्त भलंमोठं पठार आहे, हे एक या गडाचं गुणवैशिष्ट्य आहे. या गडाला इतर कोणत्याही गडापेक्षा आगळीवेगळी, अद्वितीय आणि आज तागायत अखंडित अशी तटबंदी आहे. मावळ तालुक्यामधला एक भरभक्कम किल्ला.

लोहगड व विसापूर किल्ले लोणावळ्याच्या जवळच असलेल्या मळवली येथे आहेत. पुण्यामुंबईच्या लोकांना रेल्वेने लवकर येता येत. मळवली रेल्वे स्टेशन ला उतरून तिथून भाजे गावात जायचे. भाजे गाव बौद्धकालीन लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे.

लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगडवाडीत आलं की तेथून एका बाजूला विसापूर तर दुस-या बाजूला लोहगड किल्ला आहे. लोहगड आणि विसापूर यांमधील गायमुख खिंडीवरून जात फुटक्या तटबंदीतून वर चढते जी आता बरीच रूळलेली आहे. विसापूरला येणारे बहुतेक भटके याच वाटेने वर चढतात. 

गडाचा इतिहास फारसा ज्ञात नाही. कदाचीत याची निर्मिती सातवाहन काळातील शक्यता आहे. १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला. त्यावेळी या गडाला इसागड या नावाने ओळखला गेला. ११ जून १६६५ मध्ये झालेल्या पुरंदर च्या तहात विसापूर किल्ला मोघलांच्या कडे गेला. महाराज आग्र्याहून सुटून आल्यावर पुढच्या पाच वर्षातच विसापूर चा प्रदेश पुन्हा स्वराज्यात आला.

गगडावर विस्तीर्ण असे भलेमोठे सपाटीचे पठार आणि मधोमध बालेकिल्ल्याची ती छोटीशी टेकडी अशी विसापूरची रचना आहे. गडावर किल्लेदाराच्या वाडय़ाचे आणि शिबंदीच्या काही घरटय़ांचे अवशेष शिल्लक आहेत.

अवशेष शिल्लक असून देखील गडावरील वास्तूंवर कोरीव चि-यांमधले बांधकाम केलेलं आढळत. बांधकामाची रचना देखील अत्यंत आखिव-रेखीव अशी आहे. आतील व्यक्ती बाहेर दिसणार नाही इतपत तटाची उंची, अर्धवतुळाकार बुरूज, या तटबुरुजांवरून हल्ला करण्यासाठी ठेवलेल्या जंग्या-खिडक्या, तटावरील देवतांची शिल्पे-मंगल प्रतिके, तटाच्या आतील शिबंदीची घरे, पाण्याच्या टाक्या, दारूगोळ्याची कोठारे, तटाच्या पोटातील खोल्या आहेत.

किल्ल्यावर गुहा, मंदिरे, पाण्याच्या टाक्या व वाडय़ाचे अवशेष आहेत. गडावर फेरी मारताना वाडे अन त्यांचे अवशेष दिसतात, तोफा वैगैरेंच्या जागा. गडावर एका ठिकाणी पाण्याची टाकी असून त्यावर हनुमंताचे मोठे शिल्प कोरलेले आहे. या हनुमानाचे चे टाकीतील पाण्यात प्रतििबब फार सुरेख दिसते.

गडाचे काही भरभक्कम बुरूज व तटा-बुरुजांच्या मजबूत भिंती दिसतात. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. गडावर एक मोठ बांधकामासाठी लागणाऱ्या चुन्याचं जातंही आहे. आकाश स्वच्छ असेल तर गडावरून तुंग, तिकोना व पवना धरण दिसते.

Leave a Comment

You cannot copy content of this page