बाथरूमच्या नळावर असणारे क्षारांचे डाग घालवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

आजकाल सगळीकडेच बोअरवेलच पाणी वापरल जातंय; बोअरवेलच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असत. पाण्यात असणारे क्षारांचे प्रमाण TDS (Total dissolved solids) या एककाने मोजले जाते.

बोअरवेलच्या पाण्याचा TDS हा जवळपास 600 ते 900 इतका असतो. बोअरवेल पाण्याचा वापर वाढल्यामुळे घरात असणाऱ्या नळावर पाण्यात असणाऱ्या क्षारांचा पांढऱ्या रंगाचा थर जमा होतो. हा क्षारांचा थर घालवण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपायांची माहिती आज आपण घेणार आहोत.

स्टीलच्या नळावर असणारे क्षारांचे डाग घालवण्यासाठी आपल्याला एक कपडा आणि थोडेसे व्हिनेगर लागेल. सर्वप्रथम आपल्याला ज्या नळावरचे डाग घालवायचे आहेत तो पाण्याने धुऊन कपड्याने कोरडा करा.

मग कपड्यावर साधारणपणे 50 मिली व्हिनेगर टाका; त्यानंतर मग त्या कपड्याने डाग पडलेला नळ संपूर्णपणे झाकून ठेवा 1 ते 1/5 तासाने कपडा काढून दात घासायच्या ब्रशच्या सहाय्याने थोडस घासा आणि पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने नळ चमकू लागेल.

स्टीलच्या नळावर असलेले क्षारांचे डाग घालवण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा एका वाटीत घ्या त्याध्ये थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा. हि पेस्ट दात घासायच्या ब्रशच्या सहाय्याने बाथरूमच्या नळावर लावा. अर्धा तास राहूद्या नंतर ब्रशने थोडेसे घासा. पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने नळ स्वच्छ दिसू लागेल.

आपल्याला बाथरूमच्या नळावर असणारे क्षारांचे डाग घालवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page