पाण्याची टाकी साफ करण्यासाठी उपाय

घरामध्ये वापरले जाणारे पाणी साठवण्यासाठी आपल्या घरी पाण्याची टाकी असते. बऱ्याचदा पाण्यासोबत येणाऱ्या मातीमुळे, क्षारांमुळे, शेवाळामुळे पाण्याची टाकी खराब होते. अशा टाकीमधील पाणी प्यायल्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होण्याचा धोका असतो.

कावीळ, जुलाब, कॉलरा असे बरेचशे आजार हे खराब पाणी प्यायल्यामुळे होत असतात. म्हणूनच पाण्याची टाकी साफ ठेवणे गरजेच आहे. म्हणूनच आज आपण पाण्याची टाकी साफ करण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

पाण्याची टाकी साफ करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टाकीतील सर्व पाणी रिकामे करा. टाकीतील पाणी काढून टाकल्यानंतर टाकी कपड्याच्या सहाय्याने कोरडी करून घ्या. त्यांनतर एका कपड्यावर 150 मिली व्हाईट व्हिनेगर घ्या.

त्यानंतर हातामध्ये रबरी हातमोजे घालून तो कपडा लांब काठीच्या एका टोकाला बांधून त्या कपड्याने संपूर्ण टाकी आतल्या बाजूने पुसून घ्या. अर्धा तास राहूद्या नंतर टाकीत थोडे पाणी टाकून ब्रशच्या सहाय्याने टाकी धुऊन टाका.

चांगल्या पाण्याने दोन ते तीन वेळा धुतल्यानंतर आपली टाकी साफ होईल. नंतर टाकीचा वास येतोय का हे बघून टाकीचे झाकण उघडे ठेऊन उन्हामध्ये कोरडी होऊद्या; मग टाकीमध्ये पाणी भरा.

जर आपली टाकी लहान असेल तर आपण ती धुण्यासाठी बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकता. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. माहिती आवडल्यास पोस्ट शेयर करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page