ह्या झाडाची 2 पाने खाल्याने आपले डॉक्टरचे लाखोंचे बील वाचवू शकता

आपण ग्रामीण भागात राहत असल्यास आपण ह्या झाडाचे नाव ओळखले असेलच आपल्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या ह्या झाडाचे नाव आहे पानफुटी यालाच हिंदीमध्ये पत्थरचट्टा असे म्हणतात.

जुन्या लोकांना ह्या ह्या झाडाचे असणारे आयुर्वेदिक फायदे  माहित होते त्यामुळे परसबागेत हे झाड अवश्य असायचे. आज आपण पानफुटीच्या पानांचा वापर कोणकोणत्या आजारांमध्ये करू शकतो हे जाणून घेणार आहोत.

आपल्याला शरीरावर खरचटल्यास जखम झाल्यावर जखम लवकर बरी होण्यासाठी आपण पानफुटीची काही पाने गॅसवर गरम करून त्यानंतर हाताने ती पाने चुरगळून जखमेवर लावा. नंतर जखम सुती कपड्याने बांधून टाका. हा उपाय केल्याने जखम लवकर भरून येईल.

आपल्याला अतिसार अथवा जुलाब होत असल्यास अशा वेळी आपण पानफुटीच्या पानाचा रस काढून एका वाटीत घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा तूप मिसळून ते प्या. दिवसातून 3 वेळा हा उपाय केल्याने आपल्याला होत असलेले जुलाब थांबतील.

मुळव्याध त्रास होत असलेल्यांसाठी पानफुटीची पाने खूप उपयोगी आहेत.सकाळी रिकाम्यापोटी पानफुटीच्या पानांचा रस प्यायल्याने मुळव्याध मुळे होणारा त्रास कमी व्हायला मदत मिळते.

आपल्याला डायबेटीसचा त्रास होत असल्यास सकाळी रिकाम्या पोटी चार ते पाच पानफुटीच्या पानांचा रस प्या. पानफुटीच्या पानांचा रस प्यायल्याने आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात यायला मदत मिळेल.

सतत डोकेदुखीचा त्रास होत असल्यास आपण दोन पानफुटीच्या पानांचा रस दिवसातून दोन वेळा प्या. असे केल्याने आपली डोकेदुखी कमी व्हायला मदत होईल.

रात्री झोपण्याआधी अर्धा कप पानफुटीच्या पानांचा रस आठवड्यातून तीन वेळा प्यायल्याने आपल्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर निघून जाऊन आपल्या शरीरातील रक्तशुद्ध होईल. रक्तदाब नियंत्रणात राहील. आपली प्रतिकारशक्ती वाढेल.

आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली असल्यास, आपल्याला सारखी सारखी उन्हाळी लागत असल्यास दिवसातून दोन वेळा पानफुटीच्या पानांचा 3 ते 4 चमचे रस प्या अथवा पानफुटीची काही पाने खा. असे केल्याने आपल्याला आराम मिळेल.

आपल्याला मुतखडा म्हणजेच किडनीस्टोननचा त्रास होत असल्यास नियमितपणे सकाळी रिकाम्यापोटी अर्धा कप पानफुटीच्या पानांचा रस एक महिनाभर प्या हा उपाय केल्याने आकाराने लहान असणारे खडे लघवीवाटे निघून जातील. आणि आकाराने मोठे असणारे खडे विरघळून बारीक होतील. हि क्रिया होण्यासाठी वेळ लागू शकतो.

आपल्याला पानफुटीच्या पानांपासून मिळणारे आरोग्यदायी फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page