पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय

आपल्या शरीरामधील पांढऱ्या रक्तपेशी कमी झाल्या तर त्याचा आपल्या शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो; आणि रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यावर सर्दी, खोकला, ताप, घसादुखी असे आजार होण्याचा धोका असतो.

म्हणूनच आज आपण पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत. आपण पोष्टिक गोष्टींचा आपल्या आहारात समावेश केला तर पांढऱ्या रक्तपेशी वाढू शकतात.

पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यासाठी आपण आपल्या रोजच्या आहारात तिळाचा समावेश करा. तीळामधील पोषक घटक आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी वाढतील.पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यासाठी आपण आहारात संत्री, मोसंबी, आवळा, पपई, किवी अशा फळांचा आपल्या आहारात समावेश करा.

पपईच्या पानांमध्ये एसिटोजेन्स हे घटक असतात, जे रक्तातील पांढऱ्या पेशीं वाढवायला मदत करते. यासाठी पपईच्या पानांचा रस सकाळी रिकाम्यापोटी दोन ते चार चमचे दोन दिवस घेतल्याने आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी वाढतील.

पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यासाठी आपण आहारात पालकच्या पानांचा देखील समावेश करु शकता. पालकच्या पानामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. पालकचा समावेश आहारात केल्याने रक्त वाढायला मदत होऊ शकते.

दह्यामधील प्रोबायोटिक्स घटक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगले असतात त्यामुळे पांढऱ्या रक्तपेशी कमी झालेल्यांनी आपल्या आहारात दह्याचा समावेश करावा.

आपल्याला पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page