पांढरे केस डाय न करता नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यासाठी टिप्स

आजकाल कमी वयातच केस पांढरे होत आहेत, पांढरे केस कोणालाही आवडत नाहीत. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल तरुण वयातच केस पांढरे होत आहेत. केस काळे करण्यासाठी केसांवर केमिकल युक्त रंग लावल्याने केसांचे नुकसान होते त्यामुळे आज आपण पांढरे केस डाय न करता नैसर्गिक पद्धतीने काळे कसे करू शकतो हे जाणून घेणार आहोत.

पांढरे केस काळे करण्यासाठी सर्व प्रथम एक लोखंडी कढई घ्या. त्यामध्ये 200 मिली लाकडी घाण्यात तयार केलेले मोहरीचे तेल ओतून मंद आचेवर गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे मेंहदी पावडर टाका. मेहंदी पावडर टाकताना गुठळ्या होऊ नयेत, यासाठी चमच्याने ढवळत राहा.

साधारण दोन ते तीन मिनिटे गरम होत राहू द्या. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आवळा पावडर घाला. आवळा पावडर मिसळल्याने आपल्या केसांची चमक टिकून राहायला मदत मिळेल तसेच आपले पांढरे झालेले केस काळे व्हायला मदत मिळेल.

त्यांतर दीड ते दोन चमचे मेथी पावडर टाका. यामुळे तुमच्या केसांची मुळे मजबूत होतील. हे मिश्रण तपकिरी रंगाचे होईपर्यंत गरम करून घ्या. हे मिश्रण सतत ढवळत राहा. ते तपकिरी रंगाचे झाले की गॅस बंद करून थंड होऊ द्या.

मिश्रण थंड झाल्यावर 12 ते 24 तास झाकून ठेवा.असे केल्याने मिश्रण घट्ट होईल आणि मेथी, आवळा आणि मेहंदी आपला रंग सोडतील. आता हे तेल गाळून एअर टाईट डब्यात साठवून ठेवा. ही भांडी प्लास्टिकची किंवा काचेची असायला हवीत. हे मिश्रण काही महिने साठवून ठेवू शकता.

हे तेल तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावू शकता. नेहमी शॅम्पूच्या 3 तास आधी लावा. या तेलात कापसाचा गोळा बुडवून केसांच्या मुळापर्यंत लावा. काही दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे केस रंगवण्याची काळजी करण्याची गरज नाही. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या तेलाचा कोणताही दुष्परिणाम नाही.

आपल्याला पांढरे केस डाय न करता नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यासाठी टिप्स हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page