पन्हाळा सोडल्यावर सिद्दी जौहर ने आत्महत्या का केली?

अफझलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड पासून कोल्हापूर पर्यंत एक एक किल्ला जिंकत जिंकत हिंदवी स्वराज्य वाढवत नेले. छत्रपती शिवाजी महाराजांच वाढतं स्वराज्य रोखण्यासाठी काय करता येईल याचा विचार अली आदिलशहा करू लागला.

अफझलखान सारख्या बलाढ्य सरदाराला मारून त्यांवर स्वस्थ न बसता ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं साम्राज्य वाढवत आहेत तर ते लवकरच विजापूर ला देखील असंच हल्ला करून आपलं सामराज्य संपवून टाकतील.

म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी किंवा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अली आदिलशहाने च्या एका सरदाराचा असलेला कोणे एकेकाळी गुलाम असलेला सिद्दी जौहर आपल्या कर्तृत्वावर कुरनुल चा एक सुभेदार बनला होता. त्याच्या पराक्रमासाठीच अली आदिलशाह ने छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले.

नुकत्याच झालेल्या अफझलखान वधामुळे छत्रपती शिवरायांच्या विरोधात जाण्यासाठी कोणताच आदिलशाही चा सरदार तयार नव्हता. अश्या परिस्थिती मध्ये सिद्दी जौहरने घेतलेली जबाबदारी पाहून अली आदिलशाह आता थोडा आशावादी बनला. त्याने तब्बल ३० ते ४० हजारांची फौज घेऊन स्वराज्यात दाखल झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांना याची खबर लागली की सिद्दी जौहर मोठी फौज घेऊन स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी येणार आहे. म्हणून त्याला रोखण्यासाठी शिवाजी महाराज पन्हाळा वर आले. जेणे करून सिद्दी जौहरला बाहेरच्या बाहेर परतवून लावता येईल.

पण सिद्दी जौहर देखील स्वराज्यावर पूर्ण तयारीत आला होता. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आहेत अशी खबर मिळताच त्याने मातबर सरदार आणि सैनिकांची मोठी फ़ौज घेऊन पन्हाळ्याला वेढा घातला. हा वेढा इतका मजबूत होता की गडावर कोणालाही जाता येत नव्हतं का कोण गड उतार होत होतं.

सिद्दी जौहरने छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर असताना त्यांना वेढा दिला व महाराजांची स्थिती बिकट केली. प्रचंड मोठ्या सेनेपुढे पन्हाळा किल्ला टिकवून धरणे अवघड होते. अतिशय बळकट वेढा उठवून लावण्याचे सर्व प्रयत्न फोल झाले व सरते शेवटी जौहरचा सामना करायचा असे ठरवले. परंतु जौहरच्या मोठ्या फ़ौजेचा सरळ सामना करण्याऎवजी त्यांनी जौहरला भूल देउन निसटून् जाण्याचा बेत बनवला व नव्या दमाने विशाळगडा वरून जौहरचा सामना करायचे ठरले.

पावनखिंडीतील लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते. ही लढाई १२ जुलै च्या रात्री म्हणजेच १३जुलै १६६० रोजी विशाळगडनजीक पावनखिंड अथवा घोडखिंड येथे झाली.

पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे कूच करत होते परंतु आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व शिवाजीमहाराजांच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू ज़ाला.

जेव्हा शिवाजीराजे व त्यांचे साथिदार घोडखिंडीत पोहोचले त्यावेळेस बांदल सेना आणिबाजी प्रभूदेशपांडे यांनी जोवर शिवाजी महाराज गडावर पोचत नाहीत तोवर ही खिंड लढवतील व शत्रुला तिथेच रोखून धरतील. मोहीम यशस्वी झाली महाराजांची यशस्वीपणे पन्हाळ्यावरून सुटका झाली.

पण स्वराज्यावर दुसरं संकट येऊन धडकलं. शाहिस्तेखान जवळपास साठ हजारांची फौज घेऊन स्वराज्यावर चाल करून आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तह करून सिद्दी जोहर ला पन्हाळा देण्याचं काबुल केलं. पण जोवर शाहिस्तेखानाचा बंदोबस्त होत नाही तो पर्यंत त्याने स्वराज्यावर डोळा ठेऊ नये. २ मार्च १६६० ला सिद्द्याने पन्हाळ्यावर वेढा घातला होता.

चार महिने उलटून सुद्धा गड हाती लागत नव्हता. चार महिन्यांनी का होईना पन्हाळा ताब्यात आला हे ऐकून अली आदिलशहा खुश होईल म्हणून सिद्दी जौहरने या तहाला मान्यता दिली. आणि पन्हाळा ताब्यात घेतला मोठ्या अभिमानाने त्याने पन्हाळ्यावर आदिलशाही चं निशाण फडकवलं.

आणि ही बातमी आदिलशाहच्या नव्या बादशहास दिली. पण हा बादशाह भयंकर संशयी निघाला. त्याने उलट सिद्दी जौहरची कान उघडणी केली आणि त्याच्यावर आरोप केला की त्याने शिवाजी महाराजांना पैसे देऊन गड घेतला. शिवाजी महाराजांच्या आधी तुझाच बंदोबस्त केला पाहिजे असं बोलून त्याला खडे बोल सुनावले.

सिद्दी जौहरला या गोष्टीचा भयंकर राग आला. आपल्या स्वामिनिष्ठेची परतफेड अशी होईल त्याला कल्पना देखील नव्हती.  आदिशाही बादशहा ने सूनवलेले खडे बोल त्याला सहन झाले नाही.

अली आदिलशहाला काही ही न कळवता त्याने पन्हाळा सोडून तसाच तो कुरनुल ला परतला. सिद्दी जौहरचं हे वागणं पाहून बादशाह अधिकच संतापला. सिद्द्याचा या वागण्याने त्याचा संशय अधिक बळावला.

सिद्दी जौहरला निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी अली आदिलशाहाला पत्र लिहून सारी हकीकत सांगितली. आपल्यावर घेतलेल्या संशयाने सिद्दी जौहर दुखावला होता त्यामुळे त्याने विष खाऊन आत्महत्या केली. अली आदिलशाह ला आपली चूक समजली पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.

Leave a Comment

You cannot copy content of this page