पेडगावच्या शहण्याची दुसरी फजिती

रणभूमीवर प्रत्यक्ष न उतरता आणि लढाई न करता, केवळ नऊ हजार  सैनिकी २५ हजारांच्या फौजेशी न लढता फक्त आणि फक्त गनिमी काव्याच्या जोरावर, एक कोटी होनांची दौलत अन ताज्या दमाची घोडी मोठ्या शिताफीने स्वराज्याला मिळाली आणि ते ही रक्ताचा एकही थेंब न सांडता.

कदाचित या पेडगावला झालेल्या फजिती मुळेच मराठी मध्ये आला मोठा “पेडगावचा शहाणा” ही म्हण रुजू झाली असावी याची कथा तुम्हाला माहिती असेलच नसेल तर ही कथा पुढे दिलेल्या लिंक मध्ये वाचू शकता.

आता याच पेडगावच्या शहण्याची दुसऱ्यांदा कशी फजिती झाली ते पाहुयात. अर्थात ही फजिती झाली ती शत्रूची पण शिवचरित्राचं अभ्यास करताना याचा फायदा आपल्याला अगदी आजच्या काळात किती उपयोगी पडू शकतो हे नक्की समजू शकेल.

बहादूर खान कोकलताश याच्या पेडगाववर हल्ला करून गनिमीकावा करत एक कोटी होन आणि २०० हुन अधिक अरबी घोड्यांची दौलत स्वराज्यासाठी मिळवली.

मराठ्यांनी केलेल्या दुर्दशेने बहादूर खान कोकलताश स्वतःला दोष देत चरफडत होता. केवळ दोन हजार फौजेने आपल्याला हुल दिली. आणि आपण मूर्खासारखं २५ हजाराची फौज घेऊन बहादूर गड वाऱ्यावर सोडून मराठ्यांच्या मागे मागे फिरत स्वतःच्या पायावर धोंडा आपटून घेतला.

ह्या अपमानाचा बदला घेण्याचा निश्चय बहादूर खान ने केला. मराठ्यांनी केलेली नाचक्की त्याने औरंगजेबाला लिहून पाठवली आणि त्या बरोबर त्याने या अपमानाचा सूड लवकरच घेऊ असं आश्वासन औरंगजेब यांस दिला.

बहादूर खान मराठ्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्याची तयारी करू लागला. आपल्या विश्वासू सरदारांना घेऊन तो सल्ला मसलत करून तो मोहीम आखत होता. ज्यात त्याला समजलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नुकताच पार पडला आहे.

राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांना बरेच नजराणे आणि भेटवस्तू मिळाल्या आहेत ज्या रायगडावर आहेत. आणि पावसाळ्याचे दिवस असल्याने रायगडावर पहारा देखील खूप सख्त नसतो. बहादूर खान जो दक्षिणेचा सुभेदार होता त्यामुळे सैन्य निवडीचे बरेच अधिकार औरंगजेब ने त्याला दिले होते. त्यामुळे मोठ्या फौजेने सरळ रायगडावर हल्ला करण्याची तयारी करतो.

पण रायगड वर थेट हल्ला करण्यापेक्षा रायगडास वेढा घालून आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर दबाव आणू शकतो. त्यासाठी लागणारा दारुगोळा आणि फौजफाटा त्याने औरंगाबाद आणि बुऱ्हाणपूर वरून मागवली.

बहादूर खान मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहे याची कुणकुण रायगडावर लागली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा आपली खेळी खेळायला सुरुवात केली. आपला एक खास वकील चर्चेसाठी त्यांनी बहादूरगड येथे पाठवला. बहादूर खान रायगडावर हल्ला करण्याच्या विचारात असताना अचानक आलेल्या या वकीलामुळे खान थोडा गोंधळात पडला.

वकील पेडगावच्या हल्ल्याची माफी मागायला आला. पेडगाव च्या हल्ल्या बाबत शिवाजी महाराजांना काही माहिती नव्हती. त्यांना आता मुघलांच्या सोबत हितसंबंध वाढवायचे आहेत.

मुघलांच्या सोबत उघड उघड वैर आता शिवाजी महाराजांना नको आहे. पेडगाव च्या हल्ल्यात जप्त केलेला सारा मुद्दे माल बिनशर्त परत करण्याची तयारी शिवाजी महाराजांची आहे. त्यासोबतच शिवाजी महाराजांचे पाच किल्ले देखील देण्यात येतील. इतकंच नाही तर शिवाजी महाराज औरंगजेब ची मनसब देखील स्वीकारण्याच्या तयारीत आहेत. वकिलाच्या या प्रस्तावाने खान पुरता चक्रावून गेला.

शिवाजी महाराजांनी वकीला कडे पाठवलेल्या या प्रस्तावाला बहादूर खानाने बिनशर्त मंजुरी दिली. रायगडाला वेढा घालून आपण याच मागण्यांची पूर्तता आपण शिवाजी महाराजांच्या कडून करणार होतो. पण वेढा टाकण्यापूर्वी शिवाजी महाराजांकडून प्रस्ताव आल्याने कोकलताश बेहद खुश झाला. या आनंदात त्याने वकिलामार्फत लेखी आश्वासन न घेता. या बाबत ची माहिती औरंगजेब यांस कळवली.

कारण मनसब स्वीकारण्याचा अधिकार केवळ औरंगजेब यांच्या कडे असल्याने त्या संदर्भात त्याने खलिता लिहून आग्र्याला पाठवला. शिवाजी महाराज आता हल्ल्यात घेतलेली दौलत, उंची घोडे आणि वर पाच किल्ले परत करणार म्हटल्यावर त्यांनी रायगड वर हल्ला करण्याची मोहीम थांबवली. औरंगजेब ला जेंव्हा प्रस्ताव मिळाला तेंव्हा तो देखील बेहद्द खूश झाला त्याने या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि मनसबदारीचा शाही फर्मान बहादूर गडावर पाठवला.

औरंगजेबाचं शाही फर्मान येई पर्यंत पावसाळा उलटून गेला होता. बहादूर खानाला ते शाही फर्मान मिळताच त्याने लगोलग रायगडावर निरोप धाडला की शिवाजी महाराजांनी पेडगावची दौलत, घोडे घेऊन स्वतः बहादूर गड वर येऊन मनसब स्वीकारावी. असा निरोप घेऊन वकील रायगडावर आला.

शिवाजी महाराजांच्या समोर आलेल्या वकिलाने मनसबदारीचा अर्ज सादर केला. शिवाजी महाराजांनी हा अर्ज फेटाळून लावला. बहादूर खानाचा वकील गडबडला त्याने आपण मनसब स्वीकारणार असल्याचा निरोप तुमचा वकील घेऊन आला होता.

शिवाजी महाराज बहादूर खानाच्या वकिलावर अजून कडाडले. आमच्या वकिलाने तुमच्या खानसाहेब ला आमच्या नावाचं कोणतं पत्र दिलं होतं का मग कश्यावरून तो वकील आमचा होता. असा कोणताही प्रस्ताव पाठवला नव्हता असे खडे बोल महाराजांनी वकिलाला सुनावले.

आपली पुन्हा एकदा फजिती झाल्याने बहादूर खान कोकलताश रागाने लाल झाला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी गोड गोड बोलून आपल्याला पुरतं गाफील ठेवलं.

मनसबदार होण्याचा अर्ज शिवाजी महाराजांच्या कडुन न घेता आपण फार मोठी चुक केली. दरम्यान च्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील चौक्या पहारे अधिक मजबूत केले. या चौक्या पहारे फोडून हल्ला थोडं जिकरीचे काम असल्याने हातांवर हात ठेवण्यावाचून खानाकडे पर्याय नव्हता.

Leave a Comment

You cannot copy content of this page