या आहेत भारतातील ५ सर्वात मोठ्या तोफा?

आपल्याला अनेकदा जगातील अनेक आश्चर्यांची माहिती असते. पण आपल्या शेजारी-पाजारी असलेल्या असंख्य महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसतात. याचं कारण म्हणजे गोष्टीना हवी तशी प्रसिद्धीच मिळालेली नसते.

आता हेच बघा आशिया खंडामधील सगळ्यात मोठी तोफ भारतात आहे. हे हि आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसेल. म्हणूनच आज आपण भारतातील ५ सर्वात मोठ्या तोफा कोणकोणत्या आहेत. आणि त्या कुठे आहेत. हे जाणून घेऊयात.

मेंढा तोफ – देवगिरी किल्ल्यावर चिनी महालापासुन जवळच एका बुरुजावर मेंढ्याच्या आकाराचे तोंड असलेली एक तोफ आहे जिचे नाव मेंढा तोफ अस आहे.

चारही दिशांना फिरू शकणाऱ्या ह्या तोफेला मागच्या बाजुला मेंढ्याचे तोंड आहे त्यामुळे ह्या तोफेला मेंढा तोफ असे नाव पडले. हि एक अस्सल व कलाकूसरीने मढलेली तोफ आहे देवगिरी किल्ला काहीकाळ मोगलांच्या राजधानीचा किल्ला होता औरंगजेब त्यावेळी दख्खनचा सुभेदार होता तेव्हा त्याचे या किल्ल्यावर वास्तव्य होते दौलताबादचे खरे नाव देवगिरी होते.

हा किल्ला यादवांची राजधानीचा किल्ला होता. मुस्लिम शासक ह्या तोफेला ‘तोप किला शिकन म्हणजे किल्ला तोडणारी तोफ’ अस म्हणायचे. या तोफेवर दोन ठिकाणी काही मजकूर कोरण्यात आलेला आहे.

संपूर्ण खिताबासहीत एक औ’रं’ग’जेबाचा आणि दुसरा तोफ निर्मात्याचे नाव मुहमद- हुसेन अमल-ए-अरब अस या तोफेवर कोरलेल आपल्याला पाहायला मिळत. मलिक-इ-मैदान तोफ (फारसी शब्द-अर्थ:मैदानाचा राजा) ही निजामशाही काळात अहमदनगर येथे

इ.स. १५४९ मध्ये तयार केलेली तोफ आहे. ह्या तोफेला मलिक मैदान तोफ किंवा मुलुख मैदान तोफ या नावाने ही ओळखले जाते. या तोफेचे वजन ५५ टन असून निजामशाहीतील राजा बुऱ्हानशहा याच्याकडे काम करीत असलेला तुर्की सरदार रुमीखान दख्खनी याने तांबे, लोखंड व जस्ताच्या मिश्रणातून अहमदनगर येथे ही तोफ गाळली होती.

या तोफेचे तोंड मगरीच्या उघडलेल्या जबड्यासारखे आहे. मलिक मैदान तोफेची लांबी १४ फूट ४ इंच असून तिचा व्यास ४ फूट ११ इंच आहे. निजामशाहीच्या उत्तरार्धात ही तोफ अहमदनगर येथून परांड्याच्या किल्ल्यावर व नंतर दक्षिणेत नेण्यात आली. सध्या ही तोफ विजापूर किल्ल्याच्या शाह बुरुजावर ठेवण्यात आलेली आहे.

जयबाण तोफ – आशिया खंडामधील सगळ्यात मोठी तोफ म्हणून ज्या तोफेला ओळखल जात अशी हि तोफ दुसरे सवाई जयसिंह यांनी आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी ह्या तोफेचे निर्माण करविले होते जयपूर येथील जयगड या किल्ल्यावर आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ आहे.

ह्या तोफेचा पल्ला इतका लांबवर आणि त्यामुळे होणारे नुकसान इतके भयकारी होते, की ह्या तोफेच्या केवळ उल्लेखानेच शत्रूची भीतीने गाळण उडत असल्याचे म्हटले जाते. ही भली मोठी तोफ बनविण्याकरिता ईस १७२० साली या किल्ल्यावरच विशेष कारखाना तयार करण्यात आला.

हे तोफ ओतून तयार झाल्यानंतर ह्याची चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तोफेमध्ये दारू ठासून जेव्हा त्याचा मारा करण्यात आला, तेव्हा त्या तोफेच्या गोळ्याने तब्बल पस्तीस किलोमीटरचा पल्ला गाठला.

तो गोळा जिथे पडला तिथे जमिनीमध्ये एक भले मोठे विवर तयार झाले. कालांतराने त्या विवारामध्ये पाणी साठत गेले. त्या विवराच्या ठिकाणी आता एक मोठा जलाशय पाहायला मिळतो.

ही तोफ जयगड किल्ल्यावर बनविली गेली, त्यामुळे या किल्ल्याच्या नावानारूनच या तोफेचे नामकरण करण्यात आले. या तोफेला जयबाण तोफ असे नाव देण्यात आले.

आमेरच्या जवळ स्थित असलेल्या जयगड किल्ल्यावर ही तोफ आजही दिमाखात उभी आहे. आरावली पर्वतराजीतील जयगड किल्ल्याच्या डुंगरी दरवाज्यावर उभ्या असलेल्या या तोफेची लांबी एकतीस फूट आहे.

या तोफेच्या नळीचा व्यास अकरा इंच असून ह्या तोफेचे वजन पन्नास टनापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. विशेष गोष्ट ही की या तोफेच उपयोग आजवर एकाही युद्धामध्ये केला गेला नाही.

पस्तीस किलोमीटरच्या पल्ल्यापर्यंत मारा करणाऱ्या ह्या तोफेमध्ये अंदाजे शंभर किलो बारूद बसू शकत. ह्या तोफेच्या महाकाय आकारामुळे या तोफेला किल्ल्यावरून उतरून युद्धामध्ये नेता येणे शक्य झाले नाही.

कलाल बांगडी तोफ – जंजीरा किल्ला अजिंक्य राहीला तो या अजस्त्र तोफेमुळे. या तोफेचे वैशिष्ट्य म्हणजे हि तोफ 360 अंशामधे म्हणजे गोलाकार फिरवता येते.

कलाल बांगडी या तोफेचा पल्ला १२ किमी इतका असून हि तोफ पंचधातूपासून बनलेली आहे. कितीही ऊन असले तरी तोफ अजिबात तापत नाही. ही तोफ इतकी जड होती ही ती बोटीने आणणे अशक्यप्राय होते. त्यामुळे ती तुकड्या तुक़ड्यात आणून इथे जोडण्यात आली.

मगर तोफ – ही तोफ परंडा किल्ल्यावर आहे. या तोफेला मगर तोफ म्हणण्याचे कारण की, तोफेच्या सुरूवातीलाच मगरीचे तोंड आहे. तोफेची लाम्बी १७ फूट असून व्यास सुरूवातीला ३ फूट आणि शेवटी व्यास २ फूट आणि तोफगोळ्याच्या छिद्राचा व्यास जवळपास पाऊन फूट आहे.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page