हर्पीस, कोल्ड सोर, ओठांच्या बाजूला होणारे अल्सर घरगुती उपाय

तोंडाच्या बाजूला उठलेल्या फोडांना कोल्ड सोर अस म्हटल जात. कोल्ड सोर हे हर्पीज सिम्प्लेक्स वाय’रसमुळे होतात. या आजाराच्या सुरुवातीला ओठांवर आणि तोंडाच्या आजूबाजूला लहान लहान फोड येतात ह्या फोडांच्या आजूबाजूला खाज येते काही कालावधीनंतर हे फोड फुटून जखमा होतात. हे फोड सामान्यत एक आठवड्यापर्यंत राहतात. रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यास फोड फुटून झालेल्या जखमा लवकर बऱ्या होतात.

तोंडाच्या आजूबाजूला आलेल्या फोडांमुळे खाज येत असेल तर कापसाच्या बोळ्यावर थोडेसे पुदिना तेल घेऊन त्या जागेवर लावा. काही वेळ राहूद्या. असे केल्याने खाज येणे थांबेल.

उन्हात गेल्यावर ओठांना आलेल्या कोल्ड सोरमुळे खाज येते आग होते हे टाळण्यासाठी बाहेर जाताना सनस्क्रीन लावा. ओठांना आलेल्या कोल्ड सोरवर लसणाची पाकळी थोडीशी ठेचून लावल्याने जखमा लवकर बऱ्या होतात.

रिकाम्या पोटी आल्याचा लहानसा तुकडा चघळल्याने आल्यामध्ये एंन्टीसेप्टिक गुणधर्मामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढेल जखमा लवकर बऱ्या होतील.

कोल्ड सोर ह्या आजारांपासून शरीराचं रक्षण करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे गरजेच आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण विटामिन सी असणारी फळे जसे कि संत्रे, मोसंबी, डाळिंब, आवळा, लिंबू यांचे सेवन करा.

यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल. झोपेची कमतरता तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकते. त्यामुळे पुरेशी झोप घ्या. दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्या.

आपल्याला ओठांच्या बाजूला होणारे अल्सर घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page