ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

आपले ओठ गुलाबी असतील तर त्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात भर पडते. जास्त वेळ उन्हात काम केल्याने, कॉफीचे अती सेवन केल्याने, सतत लिपस्टिक लावल्याने आपले ओठ गडद म्हणजेच काळसर दिसू लागतात.

जास्त वेळ ओठांवर लिपस्टिक लावून ठेवल्याने लिपस्टिकमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या केमिकल्समुळे आपल्या ओठांवर असणारा नैसर्गिक गुलाबी रंग निघून जातो आणि ओठ काळसर दिसू लागतात. म्हणूनच आज आपण ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

ओठांना नैसर्गिकरित्या गुलाबी करण्यासाठी आपण बीटाचा वापर करू शकता. यासाठी एक ताजे बीट किसून सावलीत सुकवा. सुकल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर तयार करा.

रोज रात्री झोपायच्या आधी अर्धा चमचा बीट पावडर थोड्याश्या गुलाबजल मध्ये मिसळून आपल्या ओठांवर लावा. सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा पाण्याने धुऊन टाका. हा उपाय साधारणपणे 15 दिवस जरी केला तरी आपले ओठ गुलाबी होतील.

आपले ओठ जास्त काळसर असतील तर आपण हा उपाय करू बघू शकता यासाठी अर्धा चमचा लिंबाचा रस घ्या त्यामध्ये थोडी साखर मिसळून हलक्या हाताने ओठांवर लावा.

त्यानंतर हलक्या हाताने चोळा. असे केल्याने ओठांवरील मृत त्वचा निघून जाईल. आणि ओठ परत पूर्वी सारखे होतील. (ओठांवर लिंबाचा रस लावल्यावर आग होत असेल तर हा उपाय करू नका)

रात्री झोपायच्या आधी ओठांवर कोरफड जेल लावले तर ओठ मुलायम होतील तसेच ओठांचा काळेपणा देखील कमी होईल. आपल्याला ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page