ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या चेहऱ्यावर डाग असलेल जसे आपल्याला आवडत नाही, तसेच ओठांच्या काळेपणाच देखील आहे. हलक्या प्रतीची लिपस्टिक वापरल्याने, प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचेतील मेलॅनिन पेशी वाढल्याने त्वचा काळवंडते आणि आपले ओठ काळसर दिसू लागतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

ओठ गुलाबी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गायीच्या दुधाच्या सायीमध्ये हळद पावडर मिसळून आपल्या ओठांवर लावा. हळदीमध्ये असणाऱ्या एन्टी-बॅक्टेरियल आणि एन्टी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे आपल्या ओठांची त्वचा मॉइश्चरायझ होईल. हे मिश्रण ओठांवर लावल्याने काही आठवड्यांत आपल्याला फरक जाणवेल.

रोज रात्री झोपण्यापूर्वी गुलाब जल लावल्याने देखील ओठांचा काळेपणा कमी व्हायला मदत मिळते. रोज रात्री झोपण्यापूर्वी थोडसा लिंबाचा रस ओठांवर लावल्याने ओठ गुलाबी होतात. मात्र हा उपाय काही आठवडे करावा लागतो.

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण बीटाचा रस आपल्या ओठांवर लावू शकता. बीट रस लावल्याने ओठांचा रंग गुलाबी होतो. बीटामध्ये लाल रंग नैसर्गिकरित्या असतो, ज्यामुळे ओठ गुलाबी होतात.

ओठांवर ग्लिसरीन लावल्याने आपल्या ओठावरील काळपटपणा निघून जाईल आणि आपले ओठ कोमल होतील. आपल्याला ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page