प्रत्येक स्त्रीला आपले ओठ गुलाबी असावे वाटत. स्त्रिया ओठांना गुलाबी करण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने वापरतात. परंतु ह्या उत्पादनाच्या वापराने हि ओठ गुलाबी होत नाहीत. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घेऊयात ह्या उपायांनी आपले ओठ खूप मऊ आणि गुलाबी होतील.
बीट हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. बीट खाल्ल्याने आपल्याला अनिमिया होत नाही. बीटाचा रंग गुलाबी असतो आणि बीट ओठांवर लावल्याने नैसर्गिक पद्धतीने ओठ गुलाबी करता येतात. बीट सुकल्यानंतर त्याचा स्क्रब बनवा आणि हा स्क्रब रोज ओठांवर लावा. हा स्क्रब ओठांवर लावल्याने ओठ गुलाबी होतील.
बीट कापून ते धुवा आणि काही दिवस उन्हात ठेवा. ते चांगले सुकल्यावर बारीक करून पावडर बनवा. यानंतर साखर बारीक वाटून त्यात ही पावडर मिसळा. हे स्क्रब एका बॉक्समध्ये ठेवा.
या स्क्रबचा वापर करताना त्यात ग्लिसरीन टाकून ओठांवर चोळा. हे स्क्रब हलक्या हातांनी ओठांवर दोन मिनिटे चोळा आणि नंतर पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा. ते साफ करताच तुमच्या ओठांवर गुलाबीपणा येईल जो बराच काळ टिकेल.
ओठांचा काळेपणा तांदळाच्या मदतीनेही दूर करता येतो. यासाठी थोडे तांदूळ घेऊन चांगले वाटून घ्या. नंतर त्यात व्हॅसलीन टाकून स्क्रब तयार करा. हा स्क्रब तुमच्या ओठांवर 3 मिनिटे हलक्या हाताने चोळा. असे केल्याने ओठांवर जमा झालेला काळेपणा दूर होईल आणि ओठ गुलाबी दिसू लागतील आणि खूप मऊही होतील.
आपल्यासाठी आम्ही नियमित महत्वपूर्ण माहिती पोस्ट करत असतो ती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा. ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.