ओठ कोरडे पडणे घरगुती उपाय

ओठ हा आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग आहेत. पण हेच ओठ थंडीच्या दिवसात सतत कोरडे होत असतात आणि फुटत असतात म्हणुनच आज आपण कोरड्या आणि फुटलेल्या ओठांवर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

आपले ओठ कोरडे पडू नये यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्यायचा प्रयत्न करा. पाणी प्यायल्याने आपली त्वचा चांगली हायड्रेटेड राहील, आपले ओठ व्यवस्थित मॉईस्चराईज्ड राहतील.

कोरडे पडलेले ओठ मऊ होण्यासाठी थोड्या गुलाबाच्या पाकळ्या दिवसभर पाण्यात भिजवून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट ओठांवर 15 मिनिटे लावून ठेवा. हा उपाय केल्याने आपले ओठ मऊ होतील.

काकडीचा रस देखील फुटलेल्या ओठाना मऊ बनवण्यासाठी उपयोगी असतो. रात्री झोपायच्या आधी काकडीचा रस ओठाना लावा. रात्रभर असेच राहू द्या. सकाळी ओठ मऊ आणि गुलाबी होतील.

दिवसातून दोनदा ओठांवर मध लावल्यानंतर थोडा वेळ मालिश करा. यामुळे फुटलेले ओठ मऊ होण्यास मदत होईल.

दुधाची साय ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि त्यांना कोरडे होण्यापासून रोखण्यासाठी अतिशय प्रभावीपणे कार्य करते. ओठांचा कोरडेपणा घालवण्यासाठी आपण हा उपाय देखील करू शकता. ओठांवर कोमट तूप किंवा लोणी लावून हलक्या हातांनी मालिश केल्याने ओठ मऊ होतात.

कोरफड औषधी गुणांनी परिपूर्ण असते. कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. रात्री झोपायच्या आधी ओठांवर कोरफड जेल लावल्याने आपले ओठ मऊ होऊ शकतात.

आपल्याला ओठ कोरडे पडणे घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page