नियमित दोरी उड्या मारल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे

आपण केलेला शारीरिक व्यायाम हा आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतो. नियमितपणे व्यायाम केल्यास आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. बदलत हवामान, बदलत राहाणीमान, खाण्यापिण्या मधील बदल यामुळे आपल्याला वेगवगेळ्या आजारांना सामोरे जावे लागते.

परंतु आपण जर नियमित कोणता तरी एक व्यायाम प्रकार केला तर आपण ह्या आजारांना रोगांना आपल्यापासून दूर ठेवू शकता. आज आपण एका सोप्या व्यायाम प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत.

हा व्यायाम प्रकार सर्वात सोपा आणि घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. ह्या व्यायाम प्रकाराचे नाव आहे दोरी उड्या मारणे. दोरी उड्या व्यायामामुळे आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल होते. चला तर मग जाणून घेऊयात नियमित दोरी उड्या मारल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात.

आपल्या शरीरामधील हाडे मजबूत करण्यासाठी नियमित दोरी उड्या मारणे फायद्याचे आहे. आपण रोज 15 मिनिटे दोरी उड्या मारल्या तरी आपल्या पायांची आणि हातांची हाडे मजबूत होऊ शकतात.

आपले वजन कमी करणाऱ्यांसाठी दोरी उड्या मारणे हा एक उत्तम आणि चांगला व्यायाम आहे. रोज 15 ते 20 मिनिटे दोरी उड्या मारल्याने आपले वजन लवकरात लवकर कमी होऊ शकते.

दोरी उड्या मारल्याने हातांची पायांची तसेच सर्व स्नायूंची योग्य रीतीने हालचाल होते. दोरी उड्या मारणे हा सोपा आणि सर्वात उपयुक्त व्यायाम मानला जातो. दोरी उड्या मारल्याने खांदे, पोट, पाय, हात अशा सर्व अवयवांचा योग्य पद्धतीने व्यायाम होतो.

खेळाडूंसाठी दोरी उड्या हा एक उत्तम व्यायाम आहे. दोरी उड्या मारल्यामुळे पायांची योग्य हालचाल होते, स्नायूंना बळकटपणा येतो. हृदयाची क्षमता वाढते त्यामुळे उत्तम खेळाडू व्हायचे असेल तर रोज थोडा वेळ का होईना दोरी उड्या मारा.

आपल्या फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यासाठी दोरी उड्या मारणे हा चांगला व्यायाम आहे. तसेच आपल्या हृदयासाठी देखील हा उत्तम व्यायाम आहे. दोरी उड्या मारल्याने शरीरावर नियंत्रण राहते. आपल्या शरीरात अतिरिक्त वाढलेले कोलेस्ट्रोल कमी होण्यासाठी आपण दोरी उड्या मारू शकता.

आपल्याला नियमित दोरी उड्या मारल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा;  अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page