नायटा घालवण्यासाठी घरगुती उपाय

एकमेकांचे कपडे वापरल्याने, दमट वातावरणामुळे, त्वचा कोरडी पडल्याने, ओले अंडरवेअर वापरल्याने पोषक आहाराच्या अभावामुळे आपल्या शरीरावर नायटा येऊ शकतो. शरीरावर नायटा येण्याआधी अंगाला खाज येते नंतर त्याजागी लालसर चट्टा पडतो त्यालाच नायटा म्हणतात.

मांड्याना, हाताना, मानेवर नायटा आल्यास तो घालवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नायटा हा संसर्गजन्य आजार आहे त्यामुळे एकमेकांचे टॉवेल, कपडे वापरल्याने हा आजार होण्याचा धोका असतो.

नायटा घालवण्यासाठी एका वाटीत लसणाच्या 3-5 पाकळ्यांचा रस घ्या त्यामध्ये थोडे मोहरीचे तेल मिसळा त्यानंतर हे मिश्रण लावण्यासाठी कापूस घ्या. कापसाचा बोळा ह्या मिश्रणात बुडवून नायट्याच्या जागेवर लावा. हा उपाय नियमित केल्याने नायटा बरा होऊन आपल्याला आराम मिळेल.

कडूलिंबाची साल सुकवून ती जाळून राहिलेल्या राखेत नारळाचे तेल मिसळून नायट्यावर लावा. हा उपाय आठ दिवस नियमित केल्याने येणारी खाज थांबून आराम मिळतो. तसेच नायटा नाहीसा होतो. कडुलिंबाच्या पानाची पेस्ट करून ती अंगाला खाज येणाऱ्या भागावर लावल्याने अंगाला येणारी खाज थांबते.

नायटा घालवण्यासाठी आपण कोरफड गराचा वापर करू शकता. कोरफड गरामध्ये एन्टी-फंगल आणि एन्टी -बॅक्टेरियल गुणधर्म असतात. नायटा आलेल्या जागेवर कोरफड गर लावल्याने येणारी खाज थांबते. आणि काही दिवस नियमित लावल्याने नायटा देखील जातो.

आपल्याला नायटा घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला सांगा. आपल्याला माहिती आवडली असल्यास कमेंट करून आम्हाला प्रोत्साहीत करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page