नाशिक मधील 3,000 वर्ष जुने गोंदेश्वर मंदिर

महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याला पौराणिक इतिहास आहे. येथील त्र्यंबकेश्वर मंदिर हे सुप्रसिद्ध आहे. याच नाशिक जिल्ह्यात आणखी एक पुरातन मंदिर आहे. नाशिक जिल्ह्यातील शिर्डी मार्गावर सिन्नर या तालुक्याच्या गावी रस्त्या लगतच असलेले गोंदेश्वराचे प्राचीन मंदिर हे महादेवाचे मंदिर आहे.

हे मंदिर पुरातन भूमिज स्थापत्यशैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. १२ व्या शतकात यादव राजकुमार राजगोविंद याने बांधलेल्याचे म्हंटले जाते. गोविंद राज्याच्या नावावरून गोविंदेश्ववर असे नाव पडले. कालांतराने गोविंदेश्ववर नावाचा अपभ्रंश होऊन गोंदेश्वर हे नाव प्रचालित झाले.

हे मंदिर ५ मंदिरांचा समूह आहे. यापैकी गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत.

मंदिराचे बांधकाम हे उकळी पद्धतीने केलेलं असून मंदिरात सभामंडप व गर्भगृह(गाभारा) आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे.

सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.

शिवमंदिरासमोर नंदीचे मंदिर आहे. हे शिव मंदिर चार खांबांवर स्थित असून मध्यभागी कासव कोरलेले आहे. मंदिराच्या खांबांवर अणि छतावर सुंदर नक्षी कोरलेल्या आहेत. खांबांवर सुबक मूर्तींचे शिल्प साकारले आहेत.

गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडप पूर्व दिशेला असून मुख्यद्वार उत्तरेकडे आहे. मंदिराच्या शिखराचे बांधकाम हे भूमिज पद्धतीचे असून पायापासून शिखरापर्यंत अप्रतिम नक्षीकाम केलेले आहे. सर्वात खालच्या बाजूस हत्ती कोरलेले आहेत. सभोवतालच्या मंदिरांवर ही असेच सुबक नक्षीकाम केलेले आढळते.

आख्यायिका: येथील हत्तींचे शिल्प अर्धवट स्वरूपात आहेत. असे म्हंटले जाते की एका चोराला इथल्या एका हत्तीच्या सोंडेत हिरा सापडला. त्यावेळी आणखी हिर्यांसच्या लालचा पोटी त्याने बाकी सर्व हत्तीच्या  शिल्पांची सोंड तोडल्या म्हणुन अर्धवट सोंडेची शिल्प अशी आख्यायिका इथ लोक सांगतात.

रथसप्तमी म्हणजेच माघ शुद्ध सप्तमीला अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच या दिवशी विद्यार्थी मंदिराच्या परिसरात सूर्यनमस्कार तसेच बलोपासनेचा संकल्प करतात.

महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवारी येथे भाविकांची गर्दी होते. गोंदेश्वराचे हे मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी घोषित केलेले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page