नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हाताची सुंदर वाढलेली नख सगळ्यांचच लक्ष वेधून घेतात. सगळ्या महिलांना आपली नखे सुंदर आकारात वाढलेली असावी अस वाटते पण बऱ्याच महिलांनी खुप प्रयत्न केले तरीही नखे लांब होत नाहीत.

अनेकांची नखे थोडी मोठी झाली की लगेच तुटतात. तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर आज आम्ही तुम्हाला नखे कशी वाढवता येतील याचे उपाय सांगणार आहोत.

तुम्हाला फक्त आम्ही सांगितलेल्या गोष्टी दिवसातून एकदा तुमच्या नखांवर घासायच्या आहेत. काही दिवसातच तुम्हाला तुमच्या नखांवर त्याचा परिणाम दिसेल.

ठिसूळ आणि तुटलेली नखे उकडलेल्या संत्र्याच्या सालीच्या पेस्टने निरोगी बनवता येतात. हे नखे वाढण्यास देखील मदत करू शकते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील चांगल्या प्रमाणात असते. आणि व्हिटॅमिन सी हॅपलोनीचिया नावाच्या नखांच्या आजारापासून संरक्षण करू शकते.

नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. एका वैज्ञानिक संशोधनानुसार, व्हिटॅमिन सी नखांसाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सीअसते, जे बॅक्टेरियाच्या संसर्गापासून नखांचे संरक्षण करू शकते.

नारळाचे तेल नखे वाढवण्याचा एक प्रभावी उपाय आहे. खोबरेल तेल बुरशीजन्य संसर्ग बरा करण्यास मदत करू शकते. संसर्गामुळे नखे कमकुवत होऊ शकतात. कमकुवत झाल्यामुळे नखे वाढणे देखील थांबू शकते. या कारणास्तव, नारळ तेल नखे वाढ उपाय म्हणून वापरले जाऊ शकते.

नखे वाढवण्यासाठी व्हॅसलीनचा वापर करू शकता. पेट्रोलियम जेलीचा वापर नखांना मॉइश्चरायझ ठेवण्यासाठी केला जातो. यामुळे ठिसूळ नखे आणि तुटण्याची समस्या कमी होऊ शकते.

आपल्याला नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय फायदे हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर शेयर करा. आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी हे फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page