नखं वाढवण्यासाठी सोप्या टिप्स

स्त्रियांचे नख आणि केस त्यांच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करत असतात. आपण बघितल असेल बऱ्याचदा डॉक्टर आपली नख बघून आपल्याला कोणता आजार झालाय हे सांगतात. नख चांगली असणे हे निरोगी असण्याचे लक्षण मानल जात. नखे कोरीव, सुंदर आणि थोडी मोठी असल्यास त्यामुळे आपल्या हातांची शोभा वाढते.

आपली नखे आणि केस एकाच प्रोटीन पासून बनलेले असतात. त्या प्रोटीनचे नाव आहे केराटीन ज्यांचा शरीरात ह्या प्रोटीनची कमतरता असते. त्यांची नखे हळूहळू वाढतात, नखे ठिसूळ होतात, सारखी सारखी नख तुटतात, नख कमजोर असणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

आपल्या आहारात काही बदल करून आपण ह्या प्रोटीनची कमतरता दूर करू शकतो; आणि नखांची वाढ जलद करू शकतो. पोष्टिक आहार घेतल्याने आपली नखे सुंदर व स्वस्थ बनू शकतात.

बायोटिन हा बी व्हिटॅमिनचा एक महत्त्वाचा प्रकार आहे बायोटिनयुक्त गोष्टींचा आहारात समावेश केल्याने आपली नख जलद वाढू शकतात. आपल्या शरीराला दररोज 2.5 मिलीग्राम इतके बायोटिन आवश्यक असते. हि गरज पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आहारात बदाम, अक्रोड, दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन, केळी, उकडलेली अंडी अशा पदार्थांचा समावेश करू शकता.

नखं वाढवण्यासाठी लसणाची पेस्ट करून ती आपल्या नखांवर आठवड्यातून दोन वेळा 30 मिनिटांसाठी लावा. नंतर धुऊन टाका असे केल्याने सुद्धा नखांची वाढ जलद होते. आठवड्यातून दोन वेळा लिंबाच्या रसामध्ये 5 मिनिटे बुडवून ठेवल्याने देखील नखांची वाढ जलद होते.

रात्री रोज बदाम तेल लावल्याने देखील नखांची वाढ जलद होते. नख दाताने कुरतडण्याची सवय असल्यास देखील नखांची वाढ खुंटते आपल्याला अशी सवय असल्यास आताच थांबवा.

नख कापताना नखे खूप लहान करणे टाळा. आपल्याला नखं वाढवण्यासाठी सोप्या टिप्स हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page