नाकावरील व्हाईटहेड घालवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या त्वचेवर लहान लहान छिद्रे असतात. त्या छिद्रांमधून घामावाटे शरीरातील घाण बाहेर पडत असते. बदलत्या  हवामानाचा, वातावरणात असणाऱ्या धूळीमुळे, प्रदूषणामुळे आपल्या त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

यासोबतच तेलकट, मसालेदार खाण्याची सवय आणि चुकीची जीवनशैली या सगळ्याचा आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होऊन आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स, कोरडेपणा, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स यायला लागतात. यापैकी व्हाईटहेड घालवण्यासाठी आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो हे आज जाणून घेणार आहोत.

व्हाईटहेड्स हे चेहऱ्यावर लहान पुरळ उठल्यासारखे दिसतात. मात्र काही काळाने चेहऱ्यावरील हे पुरळ अधिक फुगतात आणि मुरुमांचे रूप घेतात. म्हणून वेळीच त्यावर उपाय करणे गरजेच आहे.

नाकावरील व्हाईटहेड घालवण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा हि पेस्ट आपल्या नाकावर लावा. हलक्या हाताने 2 मिनिटे स्क्रब करा. हा उपाय आठवड्यातून एकदा जरी केला तरी चेहऱ्यावरील व्हाईटहेडस नाहीसे होतील.

व्हाईटहेड घालवण्यासाठी अजून एक सोपा उपाय म्हणजे मध आणि साखरेचे स्क्रब यासाठी एक चमचा मध घ्या त्यामध्ये थोडीशी साखर मिसळून आपल्या नाकावर हळुवार हाताने 2 मिनिटे चोळा ह्या उपायाने व्हाईटहेड नाहीश्या होतील.

आपण दिवसभर मेकअप करत असाल तर रात्री झोपायच्या आधी सर्व मेकअप उतरवून चेहरा पाण्याने धुऊन मग झोपा. रोमछिद्र बंद राहिल्याने चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागतात.

नियमित व्यायाम केल्याने घामासोबत व्हाईटहेड देखील निघून जातात. त्यामुळे जर आपण नियमित व्यायाम करत नसाल तर व्यायाम करायला सुरवात करा.

आपल्याला नाकावरील व्हाईटहेड घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page