नाकावरील ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय..

हवामानात होत असलेल्या बदलांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. विशेषता शहरात राहणाऱ्यांना मुलींच्या आणि मुलांच्या प्रदूषित हवामान, धूळ यामुळे चेहऱ्यावर आणि नाकावर ब्लॅकहेड्स यायला लागतात.

आता आपण ब्लॅकहेड्स म्हणजे काय हे समजून घेऊयात आपल्या त्वचेवर छोटी छोटी छिद्र असतात जे आपल्या त्वचेवर असणारे हेअर फॉलिकल्स बंद झाल्यावर दिसतात. नाक, छाती, पाठ, येथे अशी छिद्र दिसतात.

आपल्या शरीरात हा’र्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे आणि नाका जवळ असणाऱ्या तेल ग्रंथीमध्ये ब्लॅकहेड्स यायला लागतात. हे सोपे उपाय आपण जाणून घेतले तर आपल्याला ब्लॅकहेट्स कमी करण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची आवश्यकता लागणार नाही.

आपल्या नाकावर असणारे ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी आपण हा सोपा स्क्रब करू शकता. यासाठी 1 चमचा मध घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर मिसळून हे मिश्रण आपल्या नाकावर हळुवार हाताने चोळा. आठवड्यातून 2 वेळा हा स्क्रब केल्याने नक्की फायदा होईल.

आपल्याला जर दररोज मेकअप करायची सवय असेल तर त्यामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स वाढू शकतात. चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स वाढू द्यायचे नसल्यास रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावरील सगळा मेकअप उतरवून मग झोपा. मेकअपमुळे चेहऱ्यावरील रोमछिद्र बंद राहिल्याने ब्लॅकहेड्सना येण्याची संधी मिळते. म्हणून झोपण्यापूर्वी मेकअप उतरवायची सवय स्वताला लावा.

आपण दररोज व्यायाम करत असाल तर आपल्या शरीरावर येत असलेल्या घामा सोबत ब्लॅकहेट्स पण निघून जातात त्यामुळे दररोज सकाळी व्यायाम करायची सवय स्वताला लावा. असे केल्याने आपला चेहरा लखलखीत दिसेल.

चेहऱ्यावर काकडीच्या लहान लहान चकत्या कापून त्याने चेहऱ्यावर मालिश करा. असे केल्याने ब्लॅकहेट्सचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी काकडी हा सर्वोत्कृष्ट उपाय आहे.

आपल्या त्वचेच्या कोणत्याही समस्येवर कोरफड हा रामबाण उपाय आहे. ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी कोरफड गर काढून काही वेळासाठी आपल्या चेहर्या वर लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका.

आपल्याला नाकावरील ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा;  अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page