नाकावरील ब्लॅकहेड्स घरगुती उपाय

बदलेल्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. ह्या अशा वातावरणाचा धूळ आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील होतोय; जर आपली त्वचा तेलकट असेल तर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे प्रमाण देखील जास्त असेल.

ह्या वाढलेल्या प्रदुषणामुळे आपल्या चेहऱ्यावर विशेषता नाकावर ब्लॅकहेड्स येण्याचे प्रमाण हि जास्त झाल्याच आपण बघतोय. त्वचेवर असणाऱ्या लहान लहान छिद्रांमधून शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात.

मात्र आपण त्वचा सुंदर दिसावी म्हणून त्यावर वेगवेगळी सौंदर्य प्रसाधने वापरत असतो. चेहरा धुण्यासाठी आपण जो साबण वापरतो त्याचे लहान कण, वातावरणातील धुळीचे लहान कण, आपण ज्या क्रीम्स वापरतो त्यामुळे हि छिद्रे बंद होतात.

आणि त्या ठिकाणी ब्लॅकहेड्स दिसू लागतात. चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आल्याने चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. म्हणूनच आज आम्ही आपल्याला ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत.

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी एका वाटीत थोडसा कोरफड गर घ्या हलक्या हाताने तो आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 30 मिनिटे राहूद्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे नियमित दिवसातून दोन वेळा केल्याने आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स कमी होतील.

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स कमी होण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा 5 ते 10 मिनिटे गरम पाण्याची वाफ घ्या. वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्रे मोकळी व्हायला मदत होईल.

ब्लॅकहेड्स कमी होण्यासाठी नियमित व्यायाम करा; व्यायाम केल्याने येणाऱ्या घामामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स कमी व्हायला मदत होईल. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी चेहऱ्याला आठवड्यातून दोन वेळा बेकिंग सोड्याचे स्क्रब लावा.

यासाठी एका वाटीत दोन चमचे बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा हलक्या हाताने ती आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा.

हलक्या हाताने चेहरा चोळा नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे केल्याने त्वचेवरील छिद्रे मोकळी होतील; आणि ब्लॅकहेड्स कमी व्हायला मदत होईल.

चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स येऊ नये यासाठी बाहेरून आल्यानंतर चेहरा पाण्याने धुवायची सवय लावा. साबण, क्रीम्सचा वापर करणे टाळा त्याऐवजी कोरफड गर चेहऱ्याला लावा. आपला चेहरा चमकदार होईल आणि ब्लॅकहेड्स देखील येणार नाहीत.

आपल्याला नाकावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page