नाकावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी घरगुती उपाय

आज आपण ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत; ब्लॅकहेड्समुळे त्वचेची छिद्रे बंद होतात, त्यामुळे आपला चेहरा कोरडा निर्जीव दिसू लागतो. म्हणून वेळीच त्यावर उपाय करणे गरजेच असत.

ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी एका वाटीत पिकलेल्या टोमॅटोची पेस्ट घ्या. रात्री झोपण्यापूर्वी हि पेस्ट हलक्या हाताने ब्लॅक हेड्सवर लावा. रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन टाका. काही दिवस हा उपाय केल्याने आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स निघून जातील.

ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी एका वाटीत दोन चमचे मुलतानी माती आणि 2 चमचे,चंदन पावडर घ्या त्यामध्ये थोडेसे गुलाब जल मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्याने ब्लॅकहेड्स कमी होतील.

ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी दोन चमचे दालचिनी पावडर मधात मिसळून पेस्ट बनवा. आता तयार केलेली पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी ब्लॅकहेड्स आहे त्यावर लावा 15 मिनिटे राहू द्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. आठ दिवस हा उपाय केल्याने आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स कमी होतील.

ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी आपण चेहऱ्यावर बेकिंग सोड्याने स्क्रब करू शकता यासाठी दोन चमचे बेकिंग सोड्यामध्ये गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. हि पेस्ट ब्लॅकहेड्सवर लावा. काही वेळ राहू द्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.

आपल्याला “सकाळी भिजवलेले बदाम खाल्याने मिळणारे जबरदस्त फायदे ”  हि माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा.

माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page