1 ग्लास नाचणीची आंबील प्यायल्याने मिळणारे आश्चर्यकारक फायदे

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी नाचणीची पौष्टिक आंबील कशी बनवतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच नाचणीची आंबील प्यायल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे देखील जाणून घेणार आहोत.

नाचणीची आंबील बनवण्यासाठी अडीच चमचे नाचणीचे पीठ घ्या त्यामध्ये थोडेसे ताक मिसळून रात्रभर भिजू द्या. दुसऱ्यादिवशी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची पाट्यावर ठेचून बारीक करा.

त्यानंतर रात्रभर भिजलेल्या नाचणीच्या पिठामध्ये पाऊण लिटर पाणी मिसळून गॅसवर ठेवा त्यामध्ये ठेचलेला लसून आणि मिरच्या टाका. आंबीलमध्ये गुठळ्या होऊ नये यासाठी चमच्याने ढवळत राहा.

साधारणपणे 10 मिनिटे मंद आचेवर गरम केल्यावर आंबील दाट व्हायला लागते. मग गॅस बंद करून पातेले उरवून घ्या. अशा प्रकारे आपण तयार केलेली आंबील अर्धा ग्लास ताकामध्ये मिसळून पिवू शकता. आता आपण नाचणीची आंबील प्यायल्याने होणारे फायदे जाणून घेऊयात

नाचणीमध्ये विटामिन सी, कॅल्शियम, प्रोटीन, आयरन, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशिअम, फायबर, कार्बोहायड्रेट्स, यांसारखे सर्व आवश्यक पोषक घटक मोठ्याप्रमाणात असतात.

नाचणीची आंबील प्यायल्याने हिमोग्लोबिनची कमतरता दूर व्हायला मदत मिळते. नाचणीमध्ये कॅल्शियम हा घटक मोठ्या प्रमाणात असल्याने नाचणीची आंबील प्यायल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.

नाचणीची आंबील प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत मिळते. नाचणीची आंबील प्यायल्याने शरीरातील उच्च रक्तदाब पातळी नियंत्रित राहायला मदत मिळते.

जेवण केल्यानंतर नाचणीची आंबील प्यायल्याने एसीडीटी, गॅस होणे, जळजळ होणे, अपचन असे पोटासबंधित आजार होत नाही; तसेच अन्न पचन चांगल्याप्रकारे होते. पोट व्यवस्थित साफ होते. नाचणीची आंबील प्यायल्याने शरीरातील इन्सुलीनची पातळी नियंत्रित राहायला मदत मिळते.

आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण नाचणीची आंबील पिवू शकता. अशीच चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक / फॉलो करा.

आपल्याला 1 ग्लास नाचणीची आंबील प्यायल्याने मिळणारे आश्चर्यकारक फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page