मुतखडा असल्यास काय पथ्य पाळावे? मुतखडा आजार झाल्यावर कोणकोणत्या गोष्टी खाऊ नये?

आज आपण मुतखडा आजाराबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. हि माहिती मुतखडा असलेल्या रुग्णांसाठी आणि मुतखडा पडून गेलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त असणार आहे जर आपल्या मित्र परिवारापैकी कोणाला हा त्रास होत असेल तर त्यांना ह्या पोस्टच्या कमेंटमध्ये टॅग करा. सर्वप्रथम आपण मुतखडा आजार म्हणजे नेमक काय असतो हे जाणून घेऊयात.

आपल्या मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा असे म्हटल जात. मूतखडे सर्वसामान्यपणे दोन प्रकारचे असतात; कॅल्शियमचे खडे आणि युरिक ऍसिडचे खडे. त्यांना परत येण्यापासून रोखण्यासाठी आहारातील बदल आणि वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात.

आता आपण मुतखडा होण्याची कारणे समजून घेऊयात. कामाच्या गडबडीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे पाणी कमी प्यायल्याने मुतखडा होण्याचा धोका असतो; याशिवाय जर आपल्या आहारात तळलेले पदार्थ, जंक फूड, चिप्स, इतर काही खारट पदार्थ, साखरेचे पदार्थ अशा गोष्टी असतील यामुळे देखील आपल्याला मुतखडा आजार होण्याचा धोका असतो.

जर आपण चहाचे अतिसेवन करत असाल तर त्यामुळे सुद्धा मुतखडा आजार होऊ शकतो. अ’ल्कोहोलमध्ये प्यूरीन एसिड असत. जे मुतखडा तयार होण्यास मदत करत जर आपण अ’ल्कोहोल पेय (दा’रू) पित असाल तर आपल्याला मुतखडा आजार होऊ शकतो.

बोरिंगच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळे क्षार असतात. असे पाणी प्यायल्याने आपल्याला मुतखडा होण्याचा धोका असतो. आता आपण मुतखडा आजार झाला असल्यास कोणकोणती पथ्य पाळली पाहिजेत हे जाणून घेऊयात.

मुतखडा आजार झालेला असल्यास आपण शक्य तितके पाणी प्यायले पाहिजे. भरपूर पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील नको असलेले क्षार बाहेर टाकले जातील.

आपल्या आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. जसे कि हिरव्या पालेभाज्या, ताजी पिकलेली फळे विशेषता केळी, डाळिंब, द्राक्षे, इडलिंबू , संत्री अशी फळे खा.

याशिवाय मुतखडा विरघळण्यासाठी आपण सकाळी एक ते दोन चमचे अपल सायडर व्हिनेगर ग्लासभर कोमट पाण्यात मिसळून घेऊ शकता. अथवा सकाळी अर्धा कप पानफुटीच्या पानांचा रस आपण पिऊ शकता.

उसाचा रस, शहाळ्याचे पाणी, फळांचा रस अशा गोष्टी आपण खाऊ शकता. यासोबत आपला रोजचा साधा आहार आपण घेऊ शकता. आता आपण मुतखडा आजार झाला असल्यास कोणकोणत्या गोष्टी खाल्या किंवा केल्या नाही पाहिजे हे समजून घेऊयात.

मुतखडा आजार झाला असल्यास आपण सगळ्यात पहिले मिठाचे सेवन कमी करा. यासोबत पापड, लोणचे आणि इतर खारट पदार्थ खाणे थांबवा. चहा आणि कॉफीचे अतिसेवन करणे बंद करा. तसेच थंड पेय पिणे देखील टाळा.

आपल्या आहारात ज्यादा प्रोटीनयुक्त पदार्थ असतील तर त्यांचे प्रमाण कमी करा. ज्यादा प्रोटीन युक्त पदार्थांमध्ये प्युरीन घटक असतात जर आपण ज्यादा प्रोटीनयुक्त पदार्थ जसे कि अंडी, चिकन, मटन, सोयाबीन, उडीद, शेंगदाने, काजू, चॉकलेट, दुग्धजन्य पदार्थ अशा गोष्टी खाल्या तर आपल्या शरीरात प्युरीनचे प्रमाण वाढून त्यामुळे युरिक ऍसिडची पातळी वाढेल, परिणामी मुतखड्याचा आकार वाढू शकतो.

आपल्याला मुतखडा असल्यास काय पथ्य पाळावे? हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page