मुतखडा पडण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

अति मीठ खायची सवय असल्यास, अति प्रमाणात प्रोटिनयुक्त आहाराचे सेवन करत असल्यास, आणि अति गोड पदार्थ खायची सवय असल्यास ह्या अति प्रमाणात खालेल्या मीठ आणि साखरेचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही आणि मग हे टाकाऊ पदार्थ आपल्या मूत्राशयात साचून राहतात आणि आपल्याला मुतखडा हा आजार (किडनी स्टोन) होतो.

मुतखडा होण्याची हि काही महत्वाची कारणे आहेत. मुतखडा हे अवघड जागेच दुखण असल्याने बऱ्याचदा ज्यांना हा त्रास होतोय ते लवकर याचा इलाज करत नाही मग यामुळे हा त्रास वाढत जातो. म्हणूनच जर आपल्याला हा त्रास होत असल्यास वेळीच त्यावर उपचार करा.

मुतखडा आजाराची लक्षणे आपण ह्या आधीच्या लेखात जाणून घेतली आहेत त्याच्या पुढची माहिती म्हणजेच “मुतखडा लहान आकाराचा असल्यास” तो लघवीवाटे बाहेर पडण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

जर आपल्याला मुतखडा हा आजार असेल तर सगळ्यात पहिले आपण भरपूर पाणी प्यायची सवय स्वताला लावली पाहिजे. यासोबत आहारात काही पथ्य पाळली पाहिजेत. जसे कि मिठाचे आणि साखरेचे पदार्थ खाणे थांबवा. यासोबत प्रोटीनयुक्त घटक असलेला आहार घेऊ नका. चहाचे सेवन करणे थांबवा.

मुतखडा लघवीवाटे बाहेर पडण्यासाठी नियमितपणे सकाळी पानफुटीची 2 ते 3 पाने चावून खा. असे केल्याने मुतखडा लघवीवाटे बाहेर पडेल.

मुतखडा लघवीवाटे बाहेर पडण्यासाठी जेवण करण्यापूर्वी एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर ग्लासभर पाण्यात मिसळून प्या. काही दिवस हा उपाय केल्याने मुतखडा विरघळून पडून जाईल.

आपल्याला मुतखडा पडण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page