चेहऱ्यावरील मुरूम (पिंपल्स) घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

आपला चेहरा सुंदर दिसावा असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु धूळ आणि प्रदुषणामुळे आपल्या चेहऱ्यावर मुरूम येत असतात. प्रदूषणाचा सरळ परिणाम आपल्या त्वचेवर होतो. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

आपल्या चेहऱ्यावर मुरूम असतील तर चेहरा आकर्षक दिसत नाही. मुरूम केवळ चेहऱ्याचे सौंदर्यच कमी करत नाही. तर वेदनादायी सुद्धा असतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. चेहऱ्यावरील मुरूम घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

कोरफड हे आपल्या त्वचेसाठी एक वरदान आहे. चेहऱ्यावरील मुरूम आणि पुरळ घालवण्यासाठी कोरफड एक उत्तम घरगुती उपाय आहे. यासाठी कोरफडाचा गर काढून घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. काही वेळानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.

असे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील मुरूम नाहीसे होण्यास मदत मिळेल. कोरफडाच्या वापर केल्याने आपल्या त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही. कोरफडामध्ये असणाऱ्या इन्फ्लेमेटरी घटकांमुळे आपली त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते.

चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी लसणाच्या 3 / 4 पाकळ्या घ्या. आणि त्यांना बारीक करा. पाण्यात मिसळा आणि पेस्ट बनवून मुरुमांवर लावा. दहा मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा धुवा. असे केल्याने मुरूम नाहीसे होण्यास मदत मिळते.

आपल्या आहारात पिकलेल्या टॉमॅटोचा समावेश करा. टॉमॅटोमध्ये खूप सारे एंटीऑक्साडेंट असतात. जे आपल्या चेहऱ्याला चमकदार आणि सुंदर बनवतात. चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी दुधात थोडी हळद मिसळा आणि पिंपल्सवर लावा आणि नंतर १० मिनिटांनी कोमट पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतील.

चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी आपण हा सोपा उपाय करू शकता यासाठी 1 चमचा चंदन पावडर, 1 चमचा हळद पावडर आणि गुलाब जल घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करून आपल्या चेहऱ्यावर लावा.

साधारणपणे 30 मिनिटे हि पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. असे केल्याने आपल्याला चेहऱ्यावर मुरूम येण्याचे प्रमाण कमी होईल. चेहरा चमकदार होईल.

जर आपल्याला चेहऱ्यावर मुरूम येऊ नयेत असे वाटत असेल तर आपण रात्री 6 / 7 तास झोप घेणे गरजेचे आहे. 3 / 4 लिटर पाणी प्यायले पाहिजे. यामुळे नेहमी त्वचा हायड्रेट राहते आणि शरीरात रक्ताचा फ्लो कायम राहतो. तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळा. असे केल्याने आपल्याला चेहऱ्यावर मुरूम येण्याचे प्रमाण कमी होईल.

दिवसातून दोनदा आपला चेहरा पाण्याने धुऊन घेण्याची सवय लावा. असे केल्याने चेहर्या वरील घाण आणि धूळ निघून जाईल आणि आपला चेहरा तेलकट हि होणार नाही.

आपल्याला चेहऱ्यावरील मुरूम (पिंपल्स) घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page