मुळव्याध असल्यास काय पथ्य पाळावे? मुळव्याध आजार असल्यास कोणकोणत्या गोष्टी खाऊ नये?

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव यासाठी वेगवेगळ्या आजारांविषयी, औषधी वनस्पती विषयी आम्ही आपल्याला नियमित माहिती देत असतो; जर आपण आमचे फेसबुक पेज लाईक/ फॉलो केल तर हि माहिती आपल्या वाचायला मिळू शकेल.

आज आपण एका महत्वाच्या आजाराविषयी माहिती घेणार आहोत. ह्या आजाराच नाव आहे मुळव्याध इंग्रजीमध्ये याला पाइल्स अस म्हटल जात. आपल्या बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.

जास्त वेळ एका जागेवर बसून काम करणाऱ्यांना, वेळी अवेळी जेवण करण्याची सवय असल्यास, आहारात तिखट, तेलकट, अति मसालेदार,  नियमित मांसाहार करणाऱ्यांना मुळव्याध आजाराचा धोका असतो हे आपल्याला माहित असेलच.

बऱ्याचदा अवघड जागेच दुखण म्हणून मुळव्याध आजाराचे रुग्ण दुखण प्राथमिक अवस्थेत असताना पुरेशी काळजी घेत नाहीत, पथ्य पाळत नाही, वेळीच उपचार घेत नाहीत; त्यामुळे त्रास अजून वाढतो म्हणूनच मुळव्याध आजार प्राथमिक अवस्थेत असतानाच काळजी घेण गरजेच आहे.

मुळव्याध आजार प्राथमिक अवस्थेत असताना आपण पचायला हलक्या असणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत जसे कि दही, ताक, तूप, हिरव्या पालेभाज्या, मुळा, भेंडी, पडवळ, तोंडली अशा भाज्या, पिकलेली केळी, पिकलेला पेरू अशी फळे आपण खाऊ शकता. ज्वारीची भाकरी खाऊ शकता.

शक्य तितके पाणी प्यायले पाहिजे, आहाराबरोबरच ज्या गोष्टींमुळे आपल्याला मुळव्याध हा आजार झालाय असे वाटत त्या गोष्टी करणे थांबवले पाहिजे. म्हणजे जर आपण अति मसालेदार जेवण नियमित करत असाल तर तसे करणे आपण थांबवल पाहिजे. मुळव्याध आजार असल्यास हि पथ्य आपण पाळली पाहिजेत.

पचायला जड असणारे पदार्थ, तळलेले पदार्थ, तिखट, मसालेदार पदार्थ, खारट पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, आणि लोणचे खाणे तत्काळ थांबवल पाहिजे.

या बरोबरच मटकी, वाटाणा, चवळी, चणे, उडीद, अंडी, चिकन, मटन, मासे खाणे थांबवल पाहिजे. नियमित पुरेशी झोप घेतली पाहिजे. पुरेसे पाणी प्यायले पाहिजे. आपल्याला मुळव्याध असल्यास काय पथ्य पाळावे? हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page