जीभ आणि तोंडाला आतून येणाऱ्या फोडांवर प्रभावी घरगुती उपाय

आज आपण जीभ आणि तोंडाला फोड येण्याची कारणे कोणकोणती असतात आणि त्यावरील घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. शरीरात विटामिन बी चे संतुलन नसल्यास, रात्री अपुरी झोप घेतल्याने, अती तिखट मसालेदार पदार्थ खाणे, अती जास्त प्रमाणात आणि नियमित गोड पदार्थ सेवन केल्याने जीभ आणि तोंडाला आतून फोड येतात.

संपूर्ण तोंड आतून घशापर्यंत लाल होणे, तोंडाला, ओठांच्या आतल्या बाजूने फोड येणे, जीभेवर फोड येणे यालाच मराठीमध्ये तोंड येणे आणि हिंदीमध्ये मुह मे छाले आनातर  इंग्लिशमध्ये माऊथ अल्सर असे म्हणतात. तोंड आल्यानंतर संपूर्ण घसा लाल होतो. तोंड आल्यावर खाणे पिणे हि अवघड होते. म्हणूनच यावर उपाय करणे गरजेच असते.

तोंड आल्यानंतर करायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे दिवसातून चार ते पाच वेळा ताकाने गुळण्या करणे. जर आपण ताकाने गुळण्या केल्या तर एक दिवसात आपल्या आराम वाटू शकतो. उष्णतेमुळे तोंड आले असल्यास शरीरात शीतलता निर्माण होण्यासाठी आपण दिवसातून 2 वेळा कोरफड गरापासून बनवेले ज्यूस पिवू शकता.

तोंड आल्यावर केळी खाल्याने देखील आराम मिळू शकतो. तोंड आल्यावर तोंडल्याची कच्ची भाजी खाल्याने देखील आपल्याला आराम मिळू शकतो.

तोंडाला आतून जखमा झाल्या असतील तर जखमा बऱ्या होण्यासाठी आपण पेरूची पाने वाटून त्याचा लेप जखमेवर लावू शकता. असे केल्याने जखमा लवकर बऱ्या होतील.

आपल्याला जीभ आणि तोंडाला आतून येणाऱ्या फोडांवर प्रभावी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page