निरोगी आरोग्यासाठी सोपी आणि चवदार मिक्स भाज्यांचे सूप रेसिपी

सकाळच्या वेळी गरम भाज्यांचे सूप मिळाले तर मजा येते. मिक्स व्हेजिटेबल सूप हे पौष्टिक असते आणि घरी बनवायला खूप सोपे असते. हे सूप बनवायला गाजर, कोबी, कोवळे मकाचे दाणे, फरसबी अशा ताज्या भाज्या वापरून तयार केले जाते.

तुमच्या आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता. चला तर मग आज ही रेसिपी फॉलो करून घरी सूप कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा 2 चमचे, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, अर्धा कप बारीक चिरलेले गाजर, अर्धा कप बारीक कप चिरलेली कोबी, 2 चमचे कॉर्नफ्लोर (कॉर्न स्टार्च).

अर्धा कप बारीक बारीक चिरलेली फरसबी, चिमुटभर काळी मिरी पावडर, लहान चमचाभर व्हिनेगर, 2 चमचे कोवळे मकाचे दाणे, १/२ चमचा बटर किंवा तेल, 2½ कप पाणी, चवीनुसार मीठ.

त्यानंतर एका छोट्या भांड्यात २ चमचे कॉर्नफ्लोअर टाका. त्यामध्ये 3 चमचे पाणी घाला आणि चांगले मिसळून घ्या. त्यानंतर 1/2 चमचा तेल किंवा बटर कढाईमध्ये टाकून मध्यम आचेवर गरम करा. त्यामध्ये चिरलेला कांदा आणि लसूण घाला. 1-2 मिनिटे तळून घ्या.

त्यानंतर त्यामध्ये गाजर, कोबी, मकाचे कोवळे दाणे, फरसबी आणि थोडेसे मीठ घाला. आणि 3-4 मिनिटे तळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये अडीच कप पाणी टाकून हलवून घ्या. हे मिश्रण चांगले उकळण्यासाठी ठेवा. उकळायला लागल्यावर त्यामध्ये चिमुटभर मीठ टाका काळी मिरी पावडर घाला.

कॉर्नफ्लोअर चे पाणी टाकून बनवलेले द्रावण घाला आणि एक मिनिट सतत ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत शिजवा आणि सुमारे 7-8 मिनिटे शिजवल्यावर त्यामध्ये व्हिनेगर टाका.

आता आपण ह्या सूपचा आस्वाद घेऊ शकता. आपल्याला आवश्यक वाटल्यास अधिक मीठ किंवा व्हिनेगर किंवा काळी मिरी पावडर आपण मिसळू शकता.

आपल्याला निरोगी आरोग्यासाठी सोपी आणि चवदार मिक्स भाज्यांचे सूप रेसिपी हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page