बांबूच्या बारने सराव करत देशाला मिळवून दिले रौप्यपदक: वेटलिफ्टर मीराबाई चानू

टोकियो ऑलम्पिकमध्ये 49 किलोग्रॅम श्रेणीमध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानू ने देशाला पहिले रौप्यपदक जिंकून देऊन एक नवीन इतिहास रचला आहे. गेल्या रिओ ऑलम्पिक मध्ये मिळालेल्या अपयशानंतर यावर्षी रौप्यपदक जिंकून त्यांनी पदकाचे खाते उघडले.

टोकियोमध्ये झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत त्यांनी महिलांच्या m49 किलो वजनी गटामध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो आणि क्लिन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचलले.

मीराबाई चानू या मूळच्या मणिपूरच्या असून त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1994 ला झाला. 2007 मध्ये त्यांनी वेटलिफ्टिंग च्या सरावाला सुरुवात केली. लोखंडाचा बार मिळाला नसल्याने त्यांनी बांबूच्या बारने सराव केला. सराव करण्यासाठी त्यांना गावापासून 50 ते 60 किलोमीटर दूर चालत जावे लागत होते. अखेर त्यांच्या या परिश्रमाला फळ मिळाले.

2018 मध्ये भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. तसेच त्याच वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

येणाऱ्या अनेक संकटांवर मात करत, अपयशाचा सामना करत भारताला मीराबाई यांनी रौप्यपदक मिळवून दिले.  त्यांच्या या कार्याला सलाम.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page