चेहऱ्यावरील सफेद दाणे मिलीया घालवण्यासाठी घरगुती उपाय

वाढत्या प्रदुषणामुळे, केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधने, साबण वापरल्याने केराटिन तयार झाल्यामुळे आपल्या त्वचेवर विशेषत नाकाच्या जवळ, डोळ्यांच्या जवळ सफेद रंगाचे दाणे येतात त्यांनाच मिलीया असे म्हटल जात. आज आपण चेहऱ्यावरील सफेद दाणे मिलीया घालवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

चेहऱ्यावरील सफेद दाणे मिलीया घालवण्यासाठी आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वाफ घेऊ शकता. वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील मिलीया निघून जातील, आपल्या चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाऊन चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतील. चेहरा तजेलदार होईल.

चेहऱ्यावरील मिलीया जाण्यासाठी त्यावर थोडेसे मध लावा साधारण 30 मिनिटे राहूद्या नंतर पाण्याने धुऊन टाका. काही दिवस हा उपाय केल्याने चेहऱ्यावरील मिलीया कमी होतील.

चेहऱ्यावरील मिलीया जाण्यासाठी आपण त्यावर रात्री झोपायच्या आधी कोरफड जेल लावून मसाज करा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुऊन त्यावर परत थोडेसे कोरफड जेल लावून सुकू द्या मग झोपा. आठवड्याभरातच आपल्या चेहऱ्यावरील मिलीया नाहीश्या होतील.

रात्री झोपायच्या आधी चेहऱ्यावरील सगळा मेकअप उतरवून चेहरा चांगल्या फेसवॉशने धुऊन मग झोपायची सवय लावा. बाहेर पडताना चेहऱ्यावर धूळ लागू नये यासाठी स्कार्फ बांधा.

आपल्याला चेहऱ्यावरील सफेद दाणे मिलीया घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page