आपल्यापैकी काही जणांना जास्त जोराचा आवाज ऐकल्याने, प्रखर प्रकाशामुळे, तीव्र परफ्यूमच्या सुगंधामुळे, मानसीक तणावामुळे, झोप अनियमित असल्यामुळे, मा’सिक पाळी यायच्या आधी, एखाद्या गोष्टीची एलर्जी असल्यास एक बाजूने डोके दुखण्याचा त्रास होतो त्यालाच अर्धशिशी अस म्हणतात.
इंग्लिशमध्ये या आजाराला मायग्रेन असे म्हणतात. मायग्रेनच्या वेदना काही तासांपासून ते संपूर्ण दिवस होऊ शकतात. आज आपण मायग्रेनच्या वेदना कमी होण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
मायग्रेनचा त्रास होत असल्यास आपण भिजवलेले मनुके खाल्यास आपल्याला होणाऱ्या वेदना कमी व्हायला मदत मिळते. तसेच भिजवलेले मनुके खाल्याने शरीरातील पित्त कमी होऊन एसिडिटी, मळमळ, उलटी, जळजळ, डोकेदुखी यापासून देखील आराम मिळतो.
मायग्रेन होत असल्यावर नाकामध्ये गायीच्या तुपाचे दोन थेंब टाकल्याने ही आपल्याला आराम मिळू शकतो. आल्याच्या चहामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर टाकून प्यायल्याने देखील मायग्रेनचा त्रास कमी व्हायला मदत मिळते. जेव्हा मायग्रेनचा त्रास होईल तेव्हा आपण कोऱ्या चहामध्ये लवंग मिसळून तो चहा प्या असे केल्याने मायग्रेन डोकेदुखीपासून आराम मिळतो.
मायग्रेनच्या त्रासापासून आराम मिळण्यासाठी 1 चमचा दालचिनीची पावडर थंड पाण्यात मिसळून पेस्ट बनवून आपल्या कपाळावर आणि ज्या बाजूला जास्त वेदना होत आहे त्या भागावर लावा. आणि साधारणपणे 30 मिनिटे राहूद्या आपल्याला आराम मिळेल.
मायग्रेनचा त्रास आपल्याला आधीपासून होत असल्यास पुढील काळजी घेतल्यास आपल्याला आराम मिळू शकतो. तणाव घेऊ नका, मन तणावमुक्त ठेवा आणि दररोज चांगली झोप घ्या.
दररोज योगा किंवा ध्यान करायची सवय स्वताला लावा, ध्यान करणे जमत नसल्यास सुरुवातीला काही मिनिटांपासून सुरुवात करू शकता हळहळू वाढवत न्या. मायग्रेन होऊ नये यासाठी आपले शरीर हायड्रेटेड ठेवा, शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने देखील डोकेदुखी होऊ शकते.
आपल्याला मायग्रेन अर्धशिशी वेदना कमी होण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.