माऊलींच्या पायी जाणाऱ्या पालख्या रद्द होण्याची ही पहिली वेळ आहे का?

कोरोनाच्या संकटामुळे देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या माउलींच्या पालख्या रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने जारी केला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि गर्दी होऊ नये म्हणून सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहे. यामध्ये धार्मिक प्रार्थनास्थळे भक्तांच्या दर्शनासाठी बंद आहेत. गावोगावाच्या यात्रा, सण, उत्सव यावर्षी झाले नाहीत.

त्यामुळे कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी पायी जाणाऱ्या पालख्या रद्द कराव्या लागल्या. तसेच पालखी सोबत निघणाऱ्या दिंड्या देखील रद्द केल्या. पण पालखी किंवा दिंड्या रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे का? काय सांगतो इतिहास जरा बघुयात.

कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी पायी वारी होणार नाहीये. पण असे पहिल्यांदाच झाले आहे, असे नाही. संत तुकाराम महाराजांच्या काळात १६३० मध्ये देखील मोठा दुष्काळ पडला होता. इतका की लोकांना खायची भ्रांत होती. त्याकाळात देखील वारी होण्याची शक्यता फार कमी आहे.

पुढे इंग्रजांच्या काळात देखील म्हणजे इसवी सन १८३१ मध्येही श्री ज्ञानोबा-तुकोबांची पालखी नेण्यावरून संत तुकारामांच्या वंशजांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यावेळी देखील आषाढी वारीच्या सोहळ्याला गालबोट लागलं होतं.

१९१२ मध्ये प्लेगच्या काळात संसर्ग रोखण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पायी जाणाऱ्या पालखीवर निर्बंध आणले होते. पण विदर्भ मराठवाड्यातुन मात्र वारकरी आले होते यासंदर्भात लेखी पुरावे देखील मिळू शकतील. १९४२-४५ च्या काळात जेंव्हा पहिल्या महायुद्ध चे पडघम वाजले त्याच वेळी महात्मा गांधींनी चलेजाव चळवळी च आव्हान केलं तेंव्हा देखील ब्रिटिशांनीच सामूहिक कार्यक्रमांवर बंदी आणली होती त्यावेळी देखील पालखी सोहळा रद्द झाला होता.

असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी शंभर, सव्वाशे वर्षांपूर्वी प्लेग, कॉलरा, फ्लू अशा आजारांच्या साथी आल्या, तेव्हा पंढरपूर ओस पडलं होतं. त्यावेळी स्वरूप बदलून वारीचं आयोजन करण्यात आल्याचं तिथले ज्येष्ठ रहिवासी सांगतात. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रात दर एकादशीला वारी करणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे या लॉक डाउन च्या काळात कोणी भाविक आले नव्हते.

आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासनाच्या तर्फे जे प्रयत्न करता येतील ते ते प्रयत्न करण्यात येतील असे शासनातर्फे सांगण्यात आलं. आळंदी आणि देहू दशमीला पंढरपूरला नेण्यात येतील भौगोलिक परिस्थिती पाहून पादुका कश्या न्यायच्या हा निर्णय तेंव्हा घेतला जाईल. पण टेलिव्हिजनवर आषाढी सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करून भक्तांना घरातून पालखी सोहळ्यात सहभागी होता येईल.

Leave a Comment

You cannot copy content of this page