चामखीळ घालवण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय

आपला चेहरा सुंदर दिसावा अस प्रत्येकाला वाटत असत. मात्र मानेवर आणि चेहऱ्यावर असणाऱ्या या चामखीळ आपले सौंदर्य कमी करण्याचे काम करत असतात. आपल्या चेहऱ्यावर, मानेवर असणाऱ्या चामखीळमुळे आपला आत्मविश्वास कमी झाला असेल;

आणि ह्या नको असलेल्या चामखीळ आपल्या सौंदर्यावर परिणाम करत असतील तर आज आम्ही आपल्याला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने आपण घरच्या घरी चामखीळ घालवू शकाल.

शरीरावरील चामखीळ घालवण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडेसे व्हिनेगर घ्या. आणि शरीरावर ज्याठिकाणी चामखीळ आहे त्या ठिकाणी हा कापूस लावून ठेवा. नियमित काही दिवस हा उपाय केल्याने चामखीळचा रंग बदलायला लागेल आणि चामखीळ हळूहळू सूकून जाईल.

चामखीळ घालवण्यासाठी आपण रात्री झोपायच्या आधी चामखीळ असलेल्या जागेवर केळीच्या सालीचा तुकडा बांधून ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्याला चामखीळीचा रंग बदलेला दिसेल हा उपाय काही दिवस केल्याने छोट्या चामखीळ नाहीश्या होतात.

बेकिंग सोडा आणि एरंडेल तेलाची घट्टसर पेस्ट तयार करून रात्री झोपायच्या आधी ज्याठिकाणी चामखीळ आहे त्या ठिकाणी लावायचा आहे आणि वरून कपडा किंवा बँडेज लावायचे आहे. 7 दिवस नियमित हा उपाय केल्याने चामखीळ नाहीशी होते.

चामखीळ दूर करण्यासाठी कांद्याच्या रसाचा वापर आपण करू शकता. यासाठी 20 ते 25 दिवस आपल्याला कांद्याचा रस कापसावर घेऊन तो चामखीळवर लावायचा आहे.  जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कांदा कापून चामखीळ वर चोळा. हा उपाय केल्याने चामखीळ मुळापासून नाहीशी होते.

चामखीळ घालवण्यासाठी आपण चामखीळीवर अपल सायडर व्हिनेगर देखील लावू शकता. यासाठी कापसावर थोडे अपल सायडर व्हिनेगर घ्या आणि तो कापूस चामखीळीवर लावून ठेवा.

काही दिवस हा उपाय केल्याने चामखीळ नाहीशी होईल. आपल्याला चामखीळ घालवण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page