Po१७०० ते अगदी इंग्रजांची सत्ता येईपर्यंत मराठ्यांचा संपूर्ण भारतात दबदबा किती होता याचं उत्तम उदाहरण म्हणून ही घटना पाहता येऊ शकते.
काही जणानांच्या भावना दुखतील पण याचा समकालीन अस्सल पुरावे फ्रेंच पत्रव्यवहारांमध्ये स्पष्ट उल्लेख आहेत.
छत्रपती शिवरायांच्या दुर्ग व्यवस्थापनाचा अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे शिवरायांनी दुर्ग उभारणी केली ती खास करून स्वराज्याच्या बळकटी साठी अन एखादा गड जागता राहण्यासाठी जी यंत्रणा किंवा व्यवस्था उभी केली जाते त्या अनुषंगाने कित्येक जनांचा रोजगाराचा प्रश्न तडीस निघतो.
आता मूळ मुद्यावर येऊयात आज ताजमहाल सुरक्षित आहे त्याचे श्रेय महादजी शिंदे यांचे सेनापती डी बॉईन आणि काही प्रमाणात महादजी शिंदे यांना जाते.
डी बॉईन मुळे ताजमहाल या सुंदर वास्तूची माहिती पश्चिमात्य जगाला जळाली. डी बॉईन नी ही इमारत सुरक्षित राखली सन १७९४ मध्ये. महादजी शिंदे यांनी ताजमहालामध्ये आपल्या सैन्याचे घोडे बांधले होते याचा उल्लेख अनेक समकालीन फ्रेंच पत्रव्यवहार मध्ये होतो.
स्वराज्याचा विचार केला तर स्वराज्याच्या वृद्धी असलेले सैनिक हे मुख्यत्वे शेतकरी कुटुंबातील असायचे परंतु इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांच्या प्रमाणे आपली स्वतःच देखील पूर्णवेळ सैनिकी तुकडी असावी असं सदाशिव भाऊ पेशवे अन महादजी शिंदे यांना वाटत असेल.
अगदी असाच विचार निजाम आणि टिपू सुलतान यांना वाटत होते. मुत्सद्दी होते ज्यांनी कवायती फौजेचे महत्त्व ओळखले. नंतर कवायती फौजे कडे खूप भारतीय राजे संस्थाने आकर्षित झाले होते.
महादजी शिंदे यांना देखील अशी एक सैन्याची तुकडी असावी म्हणून त्यासाठी प्रयत्न सुरू केले. १७८४ मध्ये डी बॉईन हा फ्रेंच सेनापती फ्रान्स आणि रशिया मध्ये कामगिरी पाडून महादजी शिंदे च्या मराठ्यांच्या सैन्यात आला. त्याने सुरुवातीला ८५० कवायती सैन्याचे दोन पथक केवळ पाच महिन्यात तय्यार केले.
१७८५ रोजी बुंदेलखंड मध्ये कामगिरी फत्ते केली. १७८७ मध्ये राजपूत विरुद्धच्या लढाईत ऐन वेळी महादजी शिंदे यांचा पराभव होता होता या सेनापतीने विजय मिळवून दिला.
१७८९ बॉईन ने महादजी शिंदे यांना कवायती फौजेची आणखी तुकड्या करण्याची इच्छा व्यक्त केली. पण महादजी नी नकार दिला. त्यामुळे डी बॉईन ने महादजी ची नोकरी सोडली.
परंतु सैन्याची गरज आणि साम्राज्याचा विस्तारासाठी त्यांनी पुन्हा बोलावले आणि डी बॉईन ८५० सैन्याच्या आणखी 9 तुकड्या तयार केल्या.
मिर्झा इस्माईल बेग बरोबर महादजी शिंदे चे युद्ध आग्रा जवळ बाग देहऱ्या जवळ लढाई झाली. त्यावेळी घोड्याला पाऊस आणि नदीपासून सुरक्षित ठिकाण शोधत होते ते ताजमहाल च्या स्वरूपात सापडले. ताजमहाल ही इमारती शेजारी अनेक छोटी आसाऱ्याची ठिकाणे आहेत.
मुळात फ्रेंच लोक यांना स्थापत्य आणि स्थापत्यकौशल्य याचा अभ्यास आणि यांवर प्रचंड प्रेम असल्याने डी बॉईन ल ही इमारत खूप आवडली. ताजमहाल ध्या सौंदर्याने तो मंत्रमुगध झाला. त्याला इथे घोडे ठेवायची महादजी ची संकल्पना आवडली नाही.
परंतु छत्रपती शिवरायांच्या पासून आपल्या इथे शिकवण आहे की जी वास्तू अथवा वस्तू रयतेच्या उपयोगाची नाही ती पैशाचा अपव्यय च आहे. त्यामुळे स्वराज्यातील कोणत्याही व्यक्तीला अशी इमारत किंवा वास्तू म्हणजे निव्वळ पैश्याचा अपव्यय वाटत होता.
डी बॉईन ला महादजी शिंदे यांची ही गोष्ट लक्षात आली की यांच्या दृष्टीने जी गोष्ट रयतेच्या हिताची नाही ती म्हणजे पैसे अन वेळ दोघांचा ही अपव्यय आहे.
म्हणून मग त्यांनी फौजेच्या कवायती साठी महादजी नी सैन्य प्रशिक्षणासाठी काही भाग डी बॉईन यांना सैन्य प्रशिक्षणासाठी दिला. त्यात आग्रा पण होते. याचं डी बॉईन मुळे पश्चिमात्य जगात ताजं महाल चे महत्व कळले. आज जो ताजमहाल सुरक्षित आहे त्याला कळत न कळत महादजी शिंदे आणि डी बॉईन कारणीभूत आहे.
good
जर मराठ्यांचा त्यावेळी इतका दबदबा होता तर तेंव्हाच त्यानी बाबरी मशीद पाडवून राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न का केला नाही असा प्रश्न उपस्थित होतो.