मानेवर असणारा काळपटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

आपण सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची विशेष काळजी घेत असतो, परंतु आपल्या मानेवर असणाऱ्या काळेपणाकडे आपण दुर्लक्ष करतो जर तुम्हालाही मानेवर असणारा काळेपणा दूर करायचा असेल तर हि माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

मानेवरचा काळेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपायच्याआधी एका वाटीमध्ये 2 चमचे गुलाब जल घ्या त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा हे मिश्रण कापसाच्या बोळ्याने आपल्याला मानेवरील काळसर भागावर लावा.

रात्रभर राहू द्या सकाळी कोमट पाण्याने आपली मान धुऊन टाका. आपल्याला फरक दिसेल. चांगल्या परिणामासाठी हा उपाय आठवड्यातून तिन ते चार वेळा एक दिवसाआड आपण करू शकता. (जर लिंबाचा रस लावल्याने आपल्याला त्वचेवर खाज येत असेल तर हा उपाय करू नका.)

ज्यांना लिंबाच्या रसामुळे त्रास होतो त्यांच्यासाठी खास हा उपाय देत आहे यासाठी अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी घालून पेस्ट बनवा त्यानंतर हि पेस्ट आपल्या काळपट मानेवर 15 मिनिटे लावून ठेवा.

नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवडा भर हा उपाय केल्याने आपल्याला फरक दिसून येईल. मानेवरील काळेपणा दूर करण्यासाठी अजून एक उपाय देत आहे तो आपण करून बघू शकता.

ह्या उपायासाठी दोन चमचे गायीचे दुध एका वाटीत घ्या त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा चंदन पावडर मिसळून पेस्ट बनवा हि हलक्या हाताने आपल्या मानेवर लावा.

साधारण अर्धा तास राहूद्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. चांगल्या परिणामासाठी हा उपाय 15 दिवस करा. हळद, दुध आणि चंदन यांच्या मिश्रणामुळे रंग उजळायला मदत मिळते.

ह्या उपायाने चांगला परिणाम होतो म्हणून हा उपाय अनेक स्त्रिया फार पूर्वीपासून करतात. आपल्याला मानेवर असणारा काळपटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page