मानेवर असणारी चरबी कमी करण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय

आपण जसे अन्न खातो तसे आपली तब्येत बनते. जर आपल्या आहारात जास्त गोड, तेलकट, मैदायुक्त, जास्त प्रमाणात प्रोटीन असणारे पदार्थ असतील; आणि आपण दिवसभरात पुरेशी शारीरिक हालचाल, व्यायाम करत नसाल तर आपले वजन वाढलेलं असू शकत.

वजन वाढायला लागल कि पोटाच्या भोवती, मानेवर चरबीचा घेर जमा होतो. मानेवर असणाऱ्या या चरबीला डबल चिन असे म्हणतात. आज आपण मानेवर असणारी चरबी कमी करण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.

मानेवर असणारी चरबी कमी करण्यासाठी आपण हातावर अर्धा चमचा बदाम तेल घेऊन हलक्या हाताने आपल्या मानेच्या आजूबाजूला मसाज करा. मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारेल आणि मानेवरील असेलेली अतिरिक्त चरबी बर्यायच प्रमाणात कमी होईल.

मानेवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आपण दिवसातून दोन वेळा तरी एक एक कप ग्रीन टी प्या. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि वजन कमी करण्याचे गुणधर्म असतात. ग्रीन टी प्यायल्याने आपले वजन कमी व्हायला मदत होईल.

चेहऱ्यावरील आणि मानेवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आपण च्युइंगम चघळू शकता. च्युइंगम चघळताना आपल्या जबड्याचा व्यायाम होऊन मानेवरची चरबी कमी होऊ शकते.

आहारावर योग्य प्रकारे नियंत्रण आणि पुरेसा व्यायाम केला तर आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणार नाही. आपल्या रोजच मांसाहार करत असाल, तेलकट, मैदायुक्त पदार्थ, अति गोड पदार्थ खात असाल तर आपले वजन नियंत्रणात यायला फार उशीर लागू शकतो.

मात्र जर आपण हिरव्या पालेभाज्या, फळे अशा पचायला हलक्या गोष्टी खात असाल तर आपले वजन लवकर नियंत्रणात येऊ शकत. आहाराबरोबर वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे हि गरजेच आहे. व्यायाम करणे जमत नसेल तर शक्य तितके चालण्याचा प्रयत्न करा. सायकल चालवा, योगासने करा.

आपल्याला मानेवर असणारी चरबी कमी करण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page