आपला चेहरा उजळण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स वापरतो जेणेकरून आपला चेहरा उजळ दिसेल. पण अनेक वेळा आपण आपल्या मानेकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मान काळी पडते. जर आपली मान देखील काळी असेल तर ती सहज उजळ करता येऊ शकते. आज आपण मान उजळ करण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.
बटाट्यामध्ये काही असे गुणधर्म असतात जे आपली त्वचा उजळ करण्यास मदत करतात. मान उजळ करण्यासाठी एक बटाटा किसून त्याचा रस एका भांड्यात पिळून घ्या त्यात थोडा लिंबाचा रस मिसळून आपल्या मानेवर लावा. 10-15 मिनिटे सुकू द्या त्यानंतर थंड पाण्याने धुवा. असे केल्याने मानेवर असणारा काळेपणा कमी होईल.
मानेवर असणारा काळेपणा घालवण्यासाठी एका वाटीत 2 चमचे बेसन घ्या त्यामध्ये थोडेसे दही मिसळा आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेवर लावा आणि 15 मिनिटांनी पाण्याच्या मदतीने मान स्वच्छ करा. ही पेस्ट रोज लावल्याने मानेवरील काळेपणा दूर होईल.
त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी हळदीचा वापर प्राचीन काळापासून केला जातो. हळद आपल्या चेहऱ्यासाठी, त्वचेसाठी चांगली असते. चेहऱ्याप्रमाणेच तुम्ही मानेवरही हळद लावू शकता. मानेवर हळद लावल्याने मान स्वच्छ होते आणि मानेवर जमा झालेला काळेपणा दूर होतो. हळदीची पेस्ट तयार करण्यासाठी थोड्याश्या दह्यात दोन चमचे हळद टाका आणि ही पेस्ट आपल्या मानेवर लावा.
आपल्याला मानेच्या काळेपणापासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.