मांड्यावरील चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या शरीरातील हार्मोन बदलांमुळे, दिवसभर एका जागेवर बसून काम करायची सवय, आहारामध्ये जास्त प्रमाणात तेलकट, मैदायुक्त पदार्थांचा समावेश असणे, रोजच घट्ट जीन्स परिधान केल्याने मांड्यामध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा व्हायला लागते.

मांड्यांमध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा झाल्याने आपण बेढब दिसू लागता. म्हणूनच आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यांच्या मदतीने अगदी सहज आपण मांड्यावरील चरबी कमी करू शकता.

मांड्यावरील चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी मोकळ्या हवेत 30 मिनटे चालायला जाऊ शकता. चालल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

आपल्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया चांगल्याप्रकारे होते. चयापचय दर वाढतो. चरबी कमी करण्यासाठी सकाळी सायकल चालवू शकता. सायकल चालवल्याने पायाचे स्नायू मजबूत होतात.

मांड्यावरील चरबी कमी करण्यासाठी झुम्बा डान्स, एरोबिक्स प्रकारचा व्यायाम, योगा, दोरीवरच्या उड्या मारणे, पोहायला जाणे यापैकी आपल्याला जो शक्य असेल तो कोणताही एक व्यायाम प्रकार करू शकता.

जर आपल्याकडे सायकल नसेल तर एक सोपा पर्याय आपण करू शकता यासाठी जमिनीवर सपाट झोपा. आपले दोन्ही पाय हवेत करून सायकलचे पायडल मारतो त्याप्रकारे पाय हवेत फिरवा.

व्यायामाबरोबरच आहारतील तेलकट पदार्थ खाणे थांबवा, साखरचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, मांसाहार करणे देखील थांबवा; त्याऐवजी हिरव्या पालेभाज्या, गाजर, मुळा, बीट, रताळे असे फायबर घटक जास्त असणारे पदार्थ खा.

काकडी, कलिंगड, खरबूज, संत्रे, सफरचंद अशी पाणीदार फळे खा. चांगला आहार सेवन केल्याने आपण निरोगी तर राहालच शिवाय आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी देखील जमा होणार नाही.

आपल्याला मांड्यावरील चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला सांगा. माहिती आवडली असेल तर कमेंट नक्की करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page